दिग्गज नेते विजय बाबू चोरडिया शिवसेना शिंदे गटात प्रवेश

October 14, 2025

वणी : वणी शहरातील सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहून समाजसेवेच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हात देणारे प्रख्यात भाजपा पदाधिकारी विजय बाबू चोरडिया यांनी अखेर शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवी चर्चा रंगली आहे.मुंबई येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विजय बाबू चोरडिया यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश सोहळा पार पडला. या प्रसंगी अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.विजय बाबू चोरडिया यांच्या पक्षप्रवेशामुळे वणी तालुक्यात शिंदे गटाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे आणि जनसंपर्कामुळे पक्ष संघटनेला नवचैतन्य लाभेल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.