घोन्सा येथील सरपंच मंगेश मोहुर्ले यांना “महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त ..!

October 15, 2025

वणी ः-तालुक्यातील घोन्सा ग्रामपंचायात सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. संपुर्ण तालुक्यात प्रत्येक कामात अग्रगन्य असलेल्या घोन्सा ग्रामपंयात सरपंच मंगेश मोहुर्ले यांनी वणी तालुक्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे.
नालंदा ऑर्गेनायजेशन संस्थेच्या सर्वेक्षणा दरम्यान महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा 2025 नुकताच पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातील शेकडो ग्रामपंचायतींचा सहभाग होता. यामध्ये वणी तालुक्यातील घोन्सा ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक मिळत , घोन्सा गावाचे प्रथम नागरीक , सरपंच मंगेश मोहुर्ले यांना “सरपंच महाराष्ट्र रत्न” सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले.

हा पुरस्कार गाव पातळींवर केलेल्या कामांची पावती म्हणुन सरपंचाना बहाल करण्यात येतो . घोन्सा येथील सरपंच मंगेश मोहुर्ले यांनी आपल्या कार्यकाळात, ग्रीन एनर्जी (सोलर) पाणी पुरवठा , ग्रामस्थांना गरम व थंड पाणी मोफत, शुद्ध पेयजल , स्वस्थ आरोग्य,संपूर्ण गावात भूमिगत गटारे , स्वच्छ सुंदर सिमेंट काँक्रिट रस्ते , सुंदर व निसर्ग रम्य परिसर असलेले ग्रामपंचायत भवन,शिक्षण व अभ्यासिका अशा अनेक सुविधा ग्रामस्थांनपर्यंत पोहचविण्याकरिता अनेक पत्रव्यवहार करुन गावात ओढावले घेतल्या,हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेली अखंड धडपड यांचे यथोचित फळ आहे. त्यामुळे संपुर्ण घोन्सा गावाचे व सरपंच मंगेश मोहुर्ले यांचे संपुर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.