*हरित क्रांती नव्हे, नगरवाडीत सुरू होती ‘गांजा क्रांती’!*
टोलेबाज न्युज :अभय गावंडे
वणी : यवतमाळ जिल्ह्यातील महागांव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे नगरवाडी शेतशिवारात अवैध गांजा झाडांची लागवड करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी NDPS कायद्यान्वये थेट हातकडी घालून जबरदस्त कारवाई केली आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील अवैध धंदे, शस्त्र बाळगणारे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी यांचे समूळ उच्चाटन व्हावे, या हेतूने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना गोपनीय माहीतीवर कार्यवाहीचे आदेश देण्यात आले होते.
दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ (कॅम्प पुसद) पथकाला गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मौजे नगरवाडी (ता. महागांव) येथील इसम गजानन नारायण मेटकर यांनी आपल्या शेतशिवारात — सर्वे नं. 12/01 — गांजा अंमली पदार्थाची झाडे लागवड केली आहे.तत्काळ वरिष्ठांना कळवून पथकाने छापा टाकला. पंचासमक्ष पाहणी केली असता, एकूण 31 लहान-मोठ्या आकाराची, 37 किलो 500 ग्रॅम वजनाची गांजाची झाडे मिळून आली. याची एकूण किंमत तब्बल ₹1,87,500/- इतकी असून सदर मुददेमाल जप्त करून आरोपी गजानन नारायण मेटकर (वय 50, रा. नगरवाडी, ता. महागांव) याला ताब्यात घेण्यात आले.महागांव पोलीस स्टेशनमध्ये NDPS कायद्या कलम 8(ब), 20(b)(i) अन्वये गुन्हा क्रमांक 520/2025 प्रमाणे नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात (म.पो.से), मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड, तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे (स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ) व श्री. धनराज निळे (पो. स्टे. महागांव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत सपोनि धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, सफौ मुन्ना आडे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाव रणखांव, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र श्रीरामे, पोशि राजेश जाधव (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ) यांनी अतिशय धाडसी व नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.













