अपघातात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबास युवक काँग्रेसची आर्थिक मदत

October 16, 2025

वणी – मुकुटबन मार्गांवर असलेल्या ताज हॉटेल समोरील रोडवर मुरधोनी फाट्याजवळ मागाहून येणाऱ्या ट्रॅकच्या जोरदार धडकीमुळे सायकलस्वार कामगार महेंद्र सदाशिव देठे (40)रा. रंगनाथनगर, वणी यांचा दि. 25 ऑगस्ट 2025 ला अपघात झाला होता.

प्रकृती सिरिअस असल्यामुळे वणी वरून पुढील उपचारासाठी नागपूरला नेताना रस्त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी सीमा देठे व दोन मुली आहे. संसार चालवीणारा अपघातात निघून गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा जणू डोंगरच कोसळल्या सारखे झाले. ही बातमी कळताच सदभावनेने, मृतकाच्या कुटुंबाची विचारपूस करून त्यांचे दुःख थोडे फार का होईना कमी करण्यासाठी, त्यांचे सांत्वन करण्यासाठी, लातूर निवासी, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीनिवास मधुकररावजी एकुर्केकर यांनी मृताकाची पत्नी व त्यांच्या दोन मुली यांना दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू देऊन व आर्थिक मदत करून मृतात्म्यास खरी श्रद्धांजली वाहिली.

तसेच त्यांच्या दोन मुलींना पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक मदत करण्याचे आस्वासन दिले. दिवाळी सारखा सण जवळ आला असतांना, लातूर सारख्या दूर असलेल्या शहरातून येऊन श्रीनिवासजी एकुर्केकर यांनी केलेल्या मदतीमुळे मृताकाची पत्नी सीमा देठे यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी, हातजोडून नमस्कार करून त्यांचे आभार मानले.
या प्रसंगी पंढरीनाथ सोनटक्के (से. नि . मु. मार्की बु ), छगन मेंढे, दाभाडीचे सरपंच सुभाष कुडमेथे, सुनील कुमरे, झरीचे प्रशांत निमसलकर, पवन कुडसंगे व वासुदेव आत्राम उपस्थित होते.