टोलेबाज न्यूज : अभय गावंडे, यवतमाळ
वणी : यवतमाळ शहरात उधारीच्या पैशावरून एक तुफानी मारहाण झाली आहे. अनुश्री पार्क, पिंपळगाव रोड यवतमाळ येथे घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम त्रंबकराव सानप (वय 47, रा. अनुश्री पार्क) यांनी शंकरराव सावर बंदे (वय 35, रा. अनुश्री पार्क) यांच्याकडे ₹5000 मागितले. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
वादाच्या भरात आरोपीने शिवीगाळ करत हातातील दगड फेकून फिर्यादीच्या कपाळावर मारले, तसेच “जिवे मारतो” अशी धमकी दिली. ही घटना 10ऑक्टोबर 25 रोजी सकाळी 11.00 वा.दरम्यान घडली. सदरचा गुन्हा 15ऑक्टोबर 25 रोजी दुपारी 1.15 वा. दाखल करून
यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. 893/25, कलम 118(1), 352, 351(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यवतमाळ शहर पोलीस करीत आहे.













