•यवतमाळ च्या रस्त्यावर एकदा परत रक्ताची शाही उडाली !
•प्रश्न एकच, गुन्हेगार आणखी किती दिवस रस्त्यावर मोकाट फिरणार ?
टोलेबाज न्युज :अभय गावंडे
वणी; यवतमाळ — गुन्हेगारीच्या नकाशावर अजून एक ठिपका! आज दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी अशोकनगर ते पाटीपुरा रोडवर धक्कादायक घटना घडली. TVS कंपनीच्या ऍक्सेस दुचाकीवर ट्रिपल सीट फिरत असताना अचानक सगळ्यात मागे बसलेल्या इसमाने मधोमध बसलेल्या सज्जाद शेख यांच्या पोटात धारदार चाकूने वार केला!
वार एवढा भेदक होता की सज्जाद जागीच कोसळला! जिवाच्या आकांतात भावाने दवाखान्याचा रस्ता धरला, पण नियतीने साथ दिली नाही — डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहर पोलीस ठाण्यात मृताच्या भावाने तक्रार दाखल करताच गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखा व यवतमाळ पोलीस आरोपीच्या मागावर आहे .













