सायबर ठगीच्या गुन्ह्यातील यवतमाळ पोलीस दलातर्फे 15लाख रुपये वितरित केले

October 18, 2025

वणी :सायबर ठगीचा गुन्ह्यात भारत सरकार NCCRP या पोर्टलचा फार महत्वाचा व स्तुत्य उपक्रम असून ज्या लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झालेली आहे, अशा तक्रारीची या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने त्वरित नोंद करण्यासाठी केली जाते.यवतमाळ ज़िल्हयतिल फसवणूक झालेल्या तक्रारदारांना यवतमाळ ज़िल्हा पोलीस दलातर्फे NCCRP या पोर्टल द्वारे नोंद केलेल्या तक्रारीचा माध्यमातून 42 तक्रारदारांना 15 लाख रुपये मा. श्री रामानाथजी पोकळे साहेब, विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आले.

या पोर्टलचा उपयोग व वापर 2019 पासून केला जातो तसेच 2023 पासून या पोर्टलचा प्रभावीपणे वापर केला जात असून 2023 मध्ये एकूण 1055 तक्रारी प्राप्त झाल्या असून 39 लाख रुपये होल्ड करण्यात आले व 2024 मध्ये 1956 तक्रारी नोंद झाल्या असून 4 करोड रुपये होल्ड करण्यात आले व 2025 मध्ये 1585 तक्रारी प्राप्त झाल्या असून 90 लाख रुपये होल्ड करण्यात आले तसेच होल्ड केलेली रक्कम कोर्ट प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर तक्रारदार यांच्या स्वाधीन करण्यात येणार असून NCCRPया पोर्टलचे टीम PI. मुनेश्वर, GPSI डेरे,अविनाश सहारे 86 यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कार्यक्रमा करीता श्री. रामनाथजी पोकळे साहेब, विशेष मोलीस महानिरिक्षक, अमरावती परिक्षेत्र, यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता  तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात , सोबत ASP पुसद श्री. बी. जे. हर्षवर्धन , ASP पांढरकवडा श्री. बन्सल , उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा श्री. भोरे , उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ श्री. बैसाणे , उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड, श्री. गायकवाड , प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी, मुख्यालय, श्री. हुड , सर्व शाखा प्रमुख अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच तक्रारदार सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पोनि श्रीमती यशोदरा मुनेश्वर मँडम, सायबर पोलीस स्टेशन यांनी केले.