वणी पब्लिक स्कूल येथे पर्यावरणपूरक दिवाळी साजरी

October 19, 2025

वणी : येथील वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्यात आली. शाळेचे प्राचार्य श्री राकेश कुमार देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुमारे 500 विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सृजनशक्तीला चालना देत आकाश कंदील बनविणे, रांगोळी स्पर्धा, वर्ग खोली सजावट अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालयाच्या शिक्षिका सौ. टोंगे मॅडम,कु.भाग्यश्री लांडे मॅडम आणि सौ. बलकी मॅडम उपस्थित होत्या. उत्सवादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक श्री देशपांडे सर यांनी आपल्या मार्गदर्शीय भाषणात जगभरातील शहरे वाढत्या प्रदूषण पातळीशी झुंजत असताना, पर्यावरणपूरक दिवाळी निवडल्याने आरोग्याचे रक्षण होते, हे सांगितले. श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव श्री ओम प्रकाश जी चचडा तसेच व्यवस्थापन मंडळ सदस्य श्री विक्रांत जी चचडा यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी एकमेकांना तसेच शिक्षकांना मिठाई देत कार्यक्रमाचा गोडवा वाढवला. कार्यक्रमास सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.