टोलेबाज न्यूज वार्ता:
वणी : एकीकडे वणीमध्ये सगळीकडे अतिक्रमण असतांना फक्त न्यायालय लगत बाहेर परिसरातील अतिक्रमण धारकांची छोटी दुकाने काढण्यात आल्यामुळे अनेक अतिक्रमणधारकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी संबंधित जिल्हा न्यायाधीशांकडे तसेच नगरपालिका मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण उप विभाग, यांच्याकडे तक्रार निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी परिवारासकट आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. वणी दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्याचा कडेला लहान लहान तात्पुरते दुकाने टाकून व्यवसाय करीत आहेत. वणी येथे न्यायालय, तहसील कचेरी, पोलिस स्टेशन, पंचायत समिती व अन्य कार्यालय एकच ठिकाणी असल्याने तालुक्यातील नागरिक विविध कार्यासाठी हजारोंच्या संख्येने दररोज येजा करित असतात. त्यामुळे परिसरात सर्वच कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी, पक्षकार, त्याचप्रमाणे आलेली तालुक्यातील जनता यांना या परिसरात रस्त्याचा कडेला लावलेल्या छोट्या तात्पुरत्या दुकानदारांकडून सेवा पुरविल्या जात आहे. देशभरात उच्चशिक्षितांनाच शासनाकडून रोजगारांना संधी उपलब्ध होत नसल्याने देशात प्रचंड बेरोजगारीने थैमान घातले असतांना आपल्या परिवाराचे गुजराण करण्यासाठी फुटपाथवर रस्त्याचा कडेला छोटे दुकान लावून बेरोजगार आपला स्वतःचा स्वयंरोजगार प्रामाणिक व्यवसाय करीत आहेत. हा प्रकार फक्त वणी येथेच नसून संपूर्ण देशभरात आहे. त्यामुळे नाईलाजास्तव प्रशासन सुद्धा ह्याकडे दुर्लक्ष करीत असते. परंतु समाजामध्ये असेही काही विधवान लोक असतात ज्यांना बेरोजगारापाई चुकीचे व्यवसाय केलेले चालतात.परंतु प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे चालत नाहीत. हाच प्रकार न्यायालय परिसरात सुरू असलेल्या गरीब छोट्या दुकानदाराचा व्यवसायावर बुलडोझर फिरवून त्यांचा रोजगार हिरावून घेण्याचा विघ्नसंतोषी कार्य न्यायालयातील काही निवडक वकील यांचे कडून वारंवार नेहमी तक्रार केल्या जात आहे. दुसरीकडे त्याच ठिकाणी अक्षरशः रस्त्यावर काही निवडक वकील मंडळी आपली दोन चाकी, चार चाकी वाहने ,उभी करून नो पार्किंग झोन नियमांचे उल्लंघन करीत रस्त्यावर अडथळे उभे करण्याचा प्रयत्न सत आणि सातत्याने करीत असतात. त्यामुळे हा प्रकार पूर्णपणे फुटपाथ धारकावर भेदभाव करणारा ठरत आहे. नगरपरिषद,सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण उप विभाग,प्रशासन ह्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. न्यायालय परिसरातील अतिक्रमण करून स्वयंरोजगार करणाऱ्या व्यावसायिकांनी संबंधित जिल्हा न्यायाधीश, आमदार संजय दरेकर, न. प. मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम अभियंता, पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण उप विभाग, यांना निवेदन देऊन “व्यवसाय करू द्या अन्यथा रोजगार द्या, अतिक्रमण हटविण्यापूर्वी पर्यायी जागा उपलब्ध करून द्या “, आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्या पूर्ण न केल्यास परिवारासकट आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून न्यायालय परिसरा बाहेरिल फुटपाथ व्यवसाय करणारे सुरेश शेंडे, कौसर अली, रिना नंदुराव जुमनाके, नानाजी येसेकार, प्रभाकर पोटे, माया पचारे, किसन उमाटे, आबा बागडे, रामभाऊ कामटकर, आकाश बोथकर, रामचंद्र बोरपे, संजय गुरफोडे, सोहेल खान पठाण यांनी दिला आहे.













