आंदोलनकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाल्यास भाकपचे लाल सैनिक यथोचित उत्तर देणार- काॅ.अनिल हेपट

October 22, 2025

वणी: वणी विधानसभा मतदारसंघात जेवढ्या खाजगी कोळसा व सिमेंट आणि इतर कंपण्या स्थापीत होत आहेत किंव्हा सुरु आहेत अशा सर्व कंपन्यामध्ये 80% स्थानिक भुमीपुत्रांना कामावर घ्या अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने लाऊन धरली आहे.त्याअनुषंगाने बेलोरा निलजई भागातील जिएनआर व साईडएक्स कंपनीमध्ये शेती गेलेल्या भुमीपुत्रांना नोकरीत सामाऊन घेण्याची मागणी भाकपने वारंवार केली आहे.कंपनिने स्थानिक युवकांना कामावर घेण्याचा शब्द भाकपला दिला.परंतु कंपनीने वारंवार दिलेला शब्द फिरविल्याने वणी विधानसभा मतदारसंघाचे एकमेव लढाऊ लाेकनेते काॅ.अनिल हेपट यांचे नेत्रुत्वात भुमीपुत्रांनी ऐन दिवाळीत बेमुदत आंदोलन सुरु केले. कंपनीकडून आंदोलनकर्त्यांना धमक्या सुद्धा देण्याचा प्रयत्न सुरु आहे.प्रशासन मौन आहे.आंदोलकाना कसल्याही प्रकारचा धोका निर्माण झा ल्यास भाकपचे लाल सैनिक भाकप स्टाईलने उत्तर देण्यास सक्षम असल्याचा ईशारा काॅ.अनिल हेपट यांनी दिला आहे.स्थानिक युवकांच्या रोजगार हक्कासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा गेल्या चार दिवसापासून संघर्ष सुरूच…निलजई, ता. वणी, जि. यवतमाळ — वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) निलजई प्रकल्पात स्थानिक युवकांना रोजगारापासून वंचित ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वणी तालुका तर्फे १६ ऑक्टोबर २०२५ रोजी ठिया आंदोलन व १७ ऑक्टोबर रोजी रस्ता रोको आंदोलन आणि १८, १९ ऑक्टोंबर रोजी काम बंद आंदोलन करण्यात आले. कंपनी ज्या भूमीतून कोळसा काढते, त्या भूमीतील युवकांना रोजगार न देणे हा उघड अन्याय असून, भूमिहीन शेतमजूर व स्थानिक युवकांना दुर्लक्षित केल्यामुळे हा संघर्ष उभारण्यात आला.तसेही 80% स्थानिक युवकांना कंपनिने रोजगार द्यावा असा दि.18 नोव्हें.2008 चा शासनादेश आहे.आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड अनिल हेपट, कॉम्रेड अनिल घाटे, कॉम्रेड मोरेश्वर कुंटलवार, कॉम्रेड अथर्व निवडींग यांनी केले. “स्थानिकांना रोजगार द्या — बाहेरच्यांचा हस्तक्षेप थांबवा!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. पोलिस प्रशासनाने दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मात्र कॉम्रेड अनिल हेपट यांनी ठाम शब्दांत सांगितले — “मागण्या मान्य करा, अन्यथा आमच्यावर गुन्हे दाखल करा; पण लढा थांबवणार नाही.”दरम्यान, साईडएक्स कंपनीने आंदोलन दडपण्यासाठी गुंडांना पुढे करून आंदोलनकर्त्यांना धमकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. “तुम्हाला पाहून घेईन” अशा भाषेत धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी प्रशासन मात्र मौन बाळगून बसले आहे. या कंपनीच्या गुंडा मुळे परिसरात शांतता व सुवेवस्थाचा प्रश्न निर्माण होत आहे. दिवाळीसारख्या सणाच्या काळात महिला आणि लहान मुलांसह नागरिक चार दिवसांपासून रस्त्यावर बसून आंदोलन करत असताना साईडएक्स कंपनी, माईन्स व पोलिस विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने संताप उसळला आहे.आंदोलनकर्त्यांनी साईडएक्स कंपनीला WCL कडून दिलेले माती काढण्याचे ठेके बेकायदेशीर असल्याचा आरोप करून या कंपन्यांना परिसरातून हाकलून लावण्याची मागणी केली आहे. कोलमाईन्स प्रशासन आणि शासन यांच्या मिलीभगतीमुळेच हा अन्याय सुरू असल्याचे स्पष्ट करत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने चेतावणी दिली आहे की स्थानिकांना रोजगार मिळेपर्यंत आणि बेकायदेशीर कंपन्यांवर कारवाई होईपर्यंत हा संघर्ष अखंड सुरू राहील अशी भाकपने घोषणा केली.