सणासुदीला शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

October 22, 2025

वणी : ऐन दिवाळीच्या सणाला एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कुरई येथील शेतकरी शंकर गणपत चटप (36) यांनी दिनांक २० ऑक्टोबर रोजी रात्री ९:३० चे दरम्यान आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले.या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयानी उपचारा करीता रुग्णालयात चंद्रपूर येथे भर्ती केले. दरम्यान दुसऱ्या दिवशी २१ ऑक्टोंबर ला रात्री २१ वाजताचे सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला अशी माहीती मिळाली. मृतकाचे पच्शात पत्नी शितल शंकर चटप(30), मुलगा अभिनंदन शंकर चरय (5),मुलगी हिमांशी शंकर चटप(3),असा आप्त परिवार आहे.मृतकाचे कुटुंबात पत्नी शितल शंकर चटप यांचे नावे मौजा गोवारी (पा) येथे गट क्र 58/1 क्षेत्र 1.29 हे.आर. सामाईक जमीन आहे. शंकर चटप यांनी ऐन दिवाळीच्या सणाला विषारी औषध प्राशन करून आपले जिवन का संपविले? याची माहिती मिळू शकली नाही. पुढील तपास पोलीस करत आहे.