टोलेबाज न्यूज वार्ता
वणी : शिवसेना (शिंदे) पक्षाने आगामी नगरपरिषद निवडणुक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेताच पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.शिवसेनेचे सर्वेसर्वा व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, जिथे युती शक्य आहे तिथे युती करा अन्यथा स्वबळाची तयारी करा अशा पक्षाकडून सुचना आल्यानंतर आम्ही वणी नगर पालिका निवडणुकीसाठी सज्ज झाले आहोत अशी माहिती शिवसेनेचे वणी- आर्णी -चंद्रपूर लोकसभा समन्वयक श्री. विश्वास नांदेकर व शिवसेना नेते श्री विजय चोरडिया यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.विशेष म्हणजे वणी शहरातील मित्र पक्ष भाजपा आम्हांला विश्वासात न घेता निवडणूक तयारी व निर्णय घेत आहे त्यामुळे आम्हीही सर्व कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी व वणीकर जनतेच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी केली आहे.
सर्व 29 नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी पक्षाची तयारी पूर्ण
वणी शहर शिवसेना पक्षाने सर्व १४ प्रभागांचा आढावा घेतला आहे. नगराध्यक्षपदासह सर्व २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी पक्ष कार्यालयात भेट द्यावी असे आवाहन शिवसेनेचे लोकसभा समन्वयक श्री. विश्वास नांदेकर व शिवसेना नेते श्री विजय चोरडिया यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.













