“सायकल बँक” उपक्रमात सहभागी व्हा. वापरात नसलेली सायकल स्माईल फाउंडेशनला दान करा!

October 25, 2025

वणी : गरजू आणि अभ्यासू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने स्माईल फाउंडेशन तर्फे “सायकल बँक” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वापरात नसलेल्या, चांगल्या स्थितीत असलेल्या सायकली फाउंडेशनला दान स्वरूपात स्वीकारल्या जातात. त्या सायकली दुरुस्त करून गरजू विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येतात.या उपक्रमाची सुरुवात इंजिनिअरिंग विद्यार्थी मोहित हांडे यांनी स्वतःची सायकल स्माईल फाउंडेशनला डोनेट करून केली. ही सायकल अशा विद्यार्थ्याला देण्यात येणार आहे.ज्याला आई-वडील दोघेही नाहीत, जो अभ्यासात हुशार असून शिक्षणाच्या प्रवाहात आहे आणि सायकलची खरी गरज आहे.फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव, उपाध्यक्ष पियुष आत्राम, सचिव आदर्श दाढे, तसेच विश्‍वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, कुणाल आत्राम, रोहन कोरपेनवार, सचिन जाधव, तन्मय कापसे, अनिकेत वासरीकर, कार्तिक पिदुरकर, जगदीश गिरी, शुभम भेले, भूषण पारवे, सिद्धार्थ साठे आदी सदस्य या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.स्माईल फाउंडेशन ही संस्था वर्षभर पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. नागरिकांनी आपल्या वापरात नसलेल्या सायकली दान करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.फाउंडेशनची टीम नागरिकांच्या ठिकाणी जाऊन सायकल गोळा करण्याची सुविधा देत असून, इच्छुकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

संपर्क : 7038204209 स्माईल फाउंडेशनची टीम सायकल आपल्या ठिकाणाहून गोळा करेल.