मारेगावात संविधान जनजागृती यात्रा-

October 30, 2025

वणी : मारेगाव भारत जोडो अभियान अंतर्गत विविध सामाजिक संघटने मार्फत आयोजित संविधान न्याय जनजागृती यात्रा मारेगावात बुधवार ला दाखल होताच उत्स्फूर्त स्वागत करुन देशाची एकात्मता व अखंडता टिकविण्यासाठी उपस्थितांनी यथोचित मार्गदर्शन केले.

अलीकडेच संविधान विरोधी वातावरण तयार होवून संविधानातील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी होतांनाचे चित्र आहे. जाती धर्मात तेढ निर्माण करत देश अराजकतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आपले हक्क, संरक्षण व एकात्मता टीकविण्यासाठीच्या या प्रमुख उद्देशाने ही यात्रा न्यायिक जनजागृती करीत आहे.

परिणामी, संविधान जागर या ऐतिहासिक रथात मला सहभागी होण्याचे भाग्य अधोरेखित करतांना भारताचे संविधान संपूर्ण देशासाठी दिशादर्शक व भारताला सशक्त करणारी असेल असा आशावाद यावेळी मारेगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारोती गौरकार यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान न्याय जनजागृती यात्रेत विविध मुद्याचा परामर्श घेण्यात आला.याप्रसंगी वसंत जिनिंगचे संचालक अंकुश माफूर, सरपंच तुळशीराम कुमरे, जेष्ठ पत्रकार दीपक डोहणे,पत्रकार उमर शरीफ, राजु घुमे, पत्रकार भैय्याजी किनाके, मुख्य निमंत्रक उत्तमराव खंदारे, गोविंद चव्हाण, सविताताई हजारे, प्रा. दीपक वाघ, विठ्ठलराव नागतोडे यांचेसह बहुतांश नागरिकांची उपस्थिती होती.