राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी श्रद्धा देशमुख, गौरी पिदुरकर व जान्हवी ठाकरे या खेळाडूंची जिल्हा संघात निवड

November 2, 2025

वणी : भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ३६ वी सब ज्युनियर महिला राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी वणी येथील तिन खेळाडूंची जिल्हा कबड्डी संघात निवड झाली आहे.अम्युचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भशी संलग्न असलेल्या भंडारा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी क्रीडा क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाची चमक दाखविणाऱ्या वणी शहरातील कु. श्रद्धा देशमुख, कु. गौरी पिदुरकर व कु. जान्हवी ठाकरे ता तिनही खेळाडूंची निवड झाली आहे. श्री नृसिंह स्पोर्टींग क्लब वणीचे हे तिन्ही खेळाडू आहेत. या खेळाडूंना येथे योग्य प्रशिक्षण व प्रशिक्षक कुणाल विशाल ठोंबरे यांचं उत्तम मार्गदर्शन लाभलं आहे. मैदानी खेळात या खेळाडूंनी घेतलेले परिश्रम आणि त्यांच्यातील जिद्द व चिकाटीमुळे ते आज उत्कृष्ट खेळाडू म्हणून समोर आले आहेत.

मैदानी खेळात आपल्या खेळाचं उत्तम प्रदर्शन करणाऱ्या या तिनही खेळाडूंची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी झालेली निवड शहरातील क्रीडा क्षेत्रासाठी गौरवाची बाब असून शहराचाही अभिमान वाढविणारी आहे.शहरातील या तिन खेळाडूंची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांचं कौतुकही होत आहे.