तलवारीने केक कापून इंस्टाग्राम वर रील टाकने इसमास पडले महागात

November 6, 2025

वणी : आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असल्याने दि.5 नोव्हेंबर 025 ते 6नोव्हेंबर 025 रोजी विशेष मोहीम राबवून आर्म ऍक्ट कायद्या अंतर्गत आर्म ऍक्ट च्या गुन्ह्यातील मागील 05 वर्षातील सर्व आरोपी चेक करून आरोपीवर प्रतिबंधक कारवाई करावी असे मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व स्थानिक गुन्हे शाखा पथकांना आदेश पारित केले होते.

दि. 5 नोव्हेंबर 025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ हे राळेगाव परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे राळेगाव येथील वैभव टेकाम याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी धारदार लोखंडी तलवारने केक कापला होता व त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रकाशित केले होते माहितीची गांभीर्य पाहून वैभव टेकाम यांच्या घराची माहिती काढली असता तो शांतीनगर राळेगाव येथे राहत असल्याचे कळले पथकाने शांतीनगर राळेगाव गाठून वैभव मारुती टेकाम वय 24 वर्ष त्याला घरून ताब्यात घेतले व त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून एक धारदार लोखंडी तलवार जप्त करून पंचनामा करण्यात आला.

हि कारवाई मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा,पो. उपनि. धनराज हाके, पोहवा. सुनील खंडागळे, सुधीर पिदुरकर, पोका. रजनीकांत मडावी, चापोना. सतीश फुके आणि गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पार पडली