स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दरोडा व जबरी चोरीतिल आरोपी अटक”

November 11, 2025

वणी :मा.पो. अधीक्षक यवतमाळ यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे यांना महागाव पोलीस स्टेशन हद्दीत 06 महिन्यापूर्वी घडलेले दरोड्याचा गुन्हा व एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करण्याचे आदेश पारित केले होते.

दि. 10नोव्हेंबर 025 रोजी सदर गुन्हयातील संशयीत आरोपी हनुमान सुभाष धनवे दोन्ही रा. वडद ब्रम्ही ता. महागांव जि. यवतमाळ हा सोनखेड पोलीस स्टेशन हददीत राहत असल्याचे समजल्याने आरोपीचा शोधात वरिष्ठांची परवानगी घेवून नांदेड पोलीस स्टेशन सोनखेड येथे जावून शोध घेतला असता तो मौजे अंतेश्वर हददीत उसतोडीचे काम करीत असल्याचे समजल्याने तेथे जावून पोलीस कौशल्याचा वापर करून अतिशय शिताफिने हनुमान सुभाष धनवे दोन्ही रा.वडद प्रम्ही ता. महागांव जि. यवतमाळ वास ताब्यात घेवून गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांने सर्व प्रथम उडवाउडवीचे उत्तरे देवू लागल्याने त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्यांने त्याचे साथीदार ।) पवन सुरेश पवार, 2) तुषार ऊर्फ विठठल बाळू भांगे 3) जगदीश गणेश पवार, 4) मोंटी ऊर्फ चेतन मनेष चव्हाण सर्व रा.वडत्य ता. महागांव यांनी पवन सुरेश पवार यांच्या पांढ-या रंगाची स्विष्ट डिझायर कार क्रमांम MH-04-EX-41।। या गाडीने जावून जबरी चोरी करुन स्कूटी स्वार यांचे ताब्यातील सोनी कंपनीचा व्हिडोओ कैमेरा चोरी कबूल केल्याने त्यास ताब्यात घेवून त्यांच्याकडून सदर गुन्हयातील सोनी कंपनीचा व्हिडीओ कॅमेरा, गुन्हयात वापरलेले चाकू, बनावट पिस्टल 13 मोबाईल असा एकूण 1,65,300/- रु मुददेमाल 0.3 मोबाईल जप्त करुन उर्वरित आरोपी 2) तुषार ऊर्फ विठठल बाळू भांगे 3) जगदीश गणेश पवार, दोन्ही रा. बडद यांचा शोधन ताब्यात घेवून अटक केली.

तसेच दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी 1) हनुमान सुभाष धनवे दोन्ही रा.वडद ब्रम्ही ता. महागांव जि. यवतमाळ यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांने तसेच त्याचे साथीदार पवन सुरेश पवार, तुषार ऊर्फ विठठल वाळू भांगे दोन्ही रा.वडद जम्ही ता. महागांव असे दिवाळीच्या पूर्वी पल्सर मोटार सायकलवर खडका फाटा येथे जावून एका मोटार सायकलस्वार यांच्या ताब्यातील 45,000/-रु जबरी चोरी केल्याचे कबूल केल्याने महागांव पोलीस स्टेशन अप क्रमांक 522/2025 कलम 309(4), 3(5) भान्यास हा गुन्हा उघड करुन सदर गुन्हयातील आरोपी 1) हनुमान सुभाष धनवे 2) तुधार ऊर्फ विठठल वाळू भांगे दोन्ही रा.वडद ब्रम्ही ता. महागांव जि. यवतमाळ यांच्याकडून सदर गुन्हयातील एकूण रोख रक्कम 20,000/- रु. गुन्हयात वापरलेली पल्सर मोटार सायकल किंमत 60,000/- रु जप्त करुन पुढील तपास महागाव पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता , अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा , यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, पोहवा मुन्ना आहे. पोहया संतोष भोरगे, पोहवा तेजाय रणखांय पोहया सुभाष जाधव, पोहया कुणाल मुडोकार, पोख्या रमेश राठोड, पोशिसुनिल पंडागळे, चापोडपनि रविंद्र शिरामे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच साववर सेल ववतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.