भैय्याजी कनाके यांना कॉंग्रेस कडुन उमेदवारी मिळाल्यास विजय निश्चित*

November 12, 2025

वणी: प्रतिनिधी मारेगाव –आदिवासी विकास परिषदेचे तालुका अध्यक्ष तथा पत्रकार संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष भैय्याजी कनाके कॉंग्रेस पक्षा कडुन मारेगाव पंचायत समितीच्या सर्वसाधारण असलेल्या कुंभा गणातुन निवडणुक लढण्यास इच्छुक आहे. आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक पार्श्वभुमीवर बहुतेक पक्षा कडून उमेदवारी लढु इच्छीणाऱ्या इच्छुका कडुन अर्ज भरुन घेण्यात आले आहे. पंचायत समितीच्या सर्वसाधारण असलेल्या कुंभा गणात कॉंग्रेस पक्षाकडे आदिवासी विकास परिषदेचे तालुका अध्यक्ष भैय्याजी कनाके यांनीही पक्षाकडे उमेदवारी इच्छुक अर्ज भरला आहे.

या मतदार संघात सर्वसाधारण जागेसाठी कॉंग्रेस पक्षा कडे उमेदवारी मागणारा आदिवासी समाजातील एकमेव नेता दावेदारी करीत असल्याने आदिवासीसह माध्यमा मध्ये समाधानाचे वातावरण आहे. बहुतेक सर्वच पक्षा कडुन तुल्यबळ उमेदवार देण्या बाबत चाचपणी सुरु आहे. या मतदार गणात ओबीसीच्या संख्याबळा पाठोपाठ आदिवासी मतदारांची संख्या आहे. या मतदार गणात भैय्याजी कनाके यांच्या एकमेव दावेदारीने आदिवासी मताची विभागणी टळणार आहे. सर्वसाधारण जागेवर बहुतेक पक्षा कडुन जातीय संख्याबळाचा विचार करून उमेदवारी मध्ये प्राधान्यक्रम दिले जाते. मात्र कॉंग्रेस पक्षाकडे दुसऱ्या क्रमांकाचे जातीय संख्याबळ असलेल्या कनाके यांनी उमेदवारीची दावेदारी केली आहे. ईतर पक्षातील उमेदवारांची मतं विभागणी होऊन माझा विजय निश्चीत होईल असा मुद्दा त्यांनी श्रेष्ठीकडे मांडला आहे.

त्यांनी यापूर्वी पहापळ ग्रामपंचायतचे उपसरपंच पद भुषविले आहे.सद्या ते पहापळ ग्रामपंचायत पेसा कोष समीतीचे अध्यक्ष असुन ग्रामपंचायत सदस्य आहे.

तालुक्यात विविध सामाजिक क्षेत्रात मी गेल्या अनेक वर्षापासुन काम करीत आहे.अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहे. त्यामुळे मी बहुसंख्याक मतदारांचा विश्वास संपादन केला आहे. बहुजन समुहातील कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव मी यंदा*सर्वसाधारण कुंभा या पंचायत समीतीच्या मतदार गणात लढण्यास इच्छुक असून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे.इतरांच्या मताचे धृविकरण होऊन माझा विजय होईल. जनतेच्या आशीर्वादाने हा विजय फक्त्त माझा नाही. तर प्रत्येक सामान्य माणसाचा असेल. भैय्याजी कनाके, तालुका अध्यक्ष, आदिवासी विकास परिषद मारेगाव. तथा तालुका अध्यक्ष पत्रकार संरक्षण समिती मारेगाव.