टोलेबाज न्यूज :
वणी : आगामी निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मा.पो. अधीक्षक यवतमाळ यांच्या आदेशाने ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान वनी उपविभागात 11 नोव्हेंबरच 2025 चा रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी परिसरात गस्त करीत असतान गोपनीय माहितीच्या आधारे एक युवक दीपक चौपाटी परिसरात अंधाराचा फायदा घेऊन मोठा गुन्हा करण्याच्या बेतात लपून असल्याचे पक्क्या माहितीवरून पथकाने ताबडतोब दीपक चौपाटी परिसर गाठून युवकास ताब्यात घेतले.
त्याने उडवा उडवी चे उत्तर दिले असता पोलिसी शैलीचा वापर करून त्याने गोपी किसन लोणारे वय 30 वर्ष रा. सेवा नगर वणी असे सांगितले त्याच्यावर पोलीस स्टेशन वणी येथे कलम 122 मपोका प्रमाणे कारवाई करण्यात आली.
तसेच गोपनीय माहितीच्या आधारे यवतमाळ जिल्हा क्षेत्रातून तडीपार असलेला आरोपी हा दि. 12 नोव्हेंबर 025 रोजी नेताजी सुभाष चंद्र चौक वनी देशी दारू भट्टी जवळपास अपराधिक उद्देशाने फिरत असल्याचे माहितीवरून क्षणाचाही विलंब न करता पथकाने नेताजी सुभाष चंद्र चौक देशी दारू भट्टी जवळ जाऊन युवकास ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव साहिल कैलास पुरी वय 22 वर्ष रा. वणी असे सांगितले. साहिल कैलास पुरी वर उपविभागीय दंडाधिकारी नितीन कुमार हिंगोले वनी यांची न्यायालय, कार्यालयीन आदेश फौजदारी मामला प्रकरण क्रमांक -02/25 मौजा वणी तालुका वनी ज़ि. यवतमाळ कलम 56(1)(अ)(ब)मपोका. पारित दि. 23/06/2025 अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56(1)(अ)(b) कायदे अंतर्गत यवतमाळ जिल्हा क्षेत्रातून 06 महिने करिता यवतमाळ जिल्हा तथा वनी तालुक्यास लागून असलेल्या जिल्ह्यातील तालुके या क्षेत्रातून हद्दपार करण्यात आले होते. साहिल कैलास पुरी वय 22 वर्ष रा. वणी याचेवर कलम 142मपोका. प्रमाणे पोलीस स्टेशन वणी येथे कारवाई करण्यात आली.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, वनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनात पो. नि. सतीश चौरे स्था. गु.शा., सपोनि. दत्ता पेंडकर, पोहवा/2039 सुधीर पांडे,पोहवा/2272 निलेश निमकर,पोका./1336 सलमान शेख,2497 रजनीकांत मडावी, चालक पोना/417 सतीश फुके यांनी यशस्वीरित्या पार पडली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सुळे पोलीस स्टेशन मारेगाव हे करीत आहे.













