टोलेबाज न्यूज :अभय गावंडे
वणी : निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मा.पो. अधीक्षक यवतमाळ यांच्या आदेशाने गुन्हेगारीचा बिमोड करण्या हेतू जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन आदेश देण्यात आले असून स्थानिक गुन्हे शाखेने अवधूतवाडी पोलीस ठाणे गुन्हा मधील फरार आरोपी पकडण्यात यश आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाघापूर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून चौसाळा रोड वाघापूर चौकात सापळा रचण्यात आला त्या परिसरात दोन युवक संशयत पद आढळून आले असता त्यांचे विचारपूस केली असता त्याचे नाव शिवम महादेव कांबळेवय 21 वर्ष रा. मोठे वडगाव व दुसरा आकाश कैलास लंगोटे वय 20 वर्ष रा. मोठे वडगाव असे सांगितले त्याने जुन्या वादातून यश या तरुणावर कोयत्याने हल्ला करून फरार झाल्याची कबुली दिली दोघांना पुढील कारवाईसाठी अवधूत वाडी पोलीस ठाण्याचे तब्येत देण्यात आले.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात,, पोनि. सतीश चौरे,पोउपनि. गजानन राजमल्लू, सय्यद साजिद, रुपेश पाली, योगेश डगवार, प्रशांत हेडाऊ, सुनील पैठणे, आकाश सूर्यवंशी, देवेंद्र होले यांनी पार पाडली.













