वडकी पोलिसांनी गोवंश तस्करीसह 26,60,000 रू. मुद्देमाल जप्त “

November 14, 2025

वणी :13 नोव्हेंबर रोजी गोवंश तस्करी विरोधात वडकी पोलिसांनी कतलीसाठी गोवंश कोंबून एका ट्रकमध्ये हैदराबादकडे अवैध वाहतूक होत असल्याच्या गोपनीय माहितीवरून देवदरी घाटात सापळा रसून आयशर क्र MP 20 GA 9564 या वाहनास थांबून वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवंश आढळून आले.

सविस्तर वाहन उमरी, रुंजा, करंजी मार्गे वडकी कडून नागपूरकडे पळून जात असताना हायवे वरील वाहतूक थप्प करून वाहन पकडून तपासणी केली असता त्यात 33 गोवंश आढळून आले प्रत्येकी किंमत 20,000 रू. प्रमाणे एकूण 6,60,000 रू. किमतीचे गोवंश आणि आयशर वाहन किं. 20,00,000 रू. असे एकूण 26,60,000 रू. मुद्देमालासह आरोपी 1) मो. नसीम मो. यासिन रा. अमित नगर नागपूर याच्यासह ताब्यात घेहून कलम 325 भारतीय न्याय संहिता सहकलम 5,5(अ ), 5(ब ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सह कलम 11 प्राण्यास क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहा. पोलीस अधीक्षक उपविभागीय पांढरकवडा रॉबिन बंसल यांच्या मार्गदर्शनात पो.स्टे. वडकी ठाणेदार सपोनि. भोरकडे पोउनि. कुडमेथे, चालक मडकाम यांच्या टीम सह पांढरकवडा पोउनि. सुशीर यांनी केली.