गोवंश तस्करीचा पर्दाफाश वडकी पोलिसाना पुन्हा यश “

November 18, 2025

वणी: दि.17 नोव्हेंबर 025 रोजी पोलीस स्टेशन वडकी हददीतुन एक केशरी रंगाच्या ट्रकमध्ये कत्तलीसाठी गोवशांची हैद्राबाद कडे अवैध्यरीत्या वाहतुक होत असल्याबाबत गोपनिय माहीती वरून हददीतील राष्टीय महामार्ग क 44 वर ठिकठिकाणी टीम नेमुण सदर केशरी रंगाचे ट्रकचा शोध घेऊन एक केशरी रंगाचा ट्रक क्रमांक एम एच 40 B. L. 3762 या ट्रकला नागपुर कडे पळुन जात असताना वर्धा नदीच्या पुलावर दोन्ही कडील वाहतुक ठप्प करून पकडण्यात आले.

सदर या वाहनाची पंचा समक्ष तपासणी केली असता या वाहना मध्ये 22 गोवंश प्रत्येकी 25,000- रू. प्रमाणे एकुण 5,50,000- आणी वाहणाची किमंत 20,00,000- रू.असा एकुण 25,50,000- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आलाअसून या गुन्हयातील अज्ञात आरोपीतांवर कलम 325 भान्यास.2023 सह कलम 5, 5 अ, 5 ब महाराष्ट्र प्राणी सरक्षण कायदा, सहकलम 11 प्राण्यास कुरतेने वागविण्यास प्रतीबंध अधिनियम आणि कलम 184/177 मोटार वाहन कायदा प्रमाने गुन्हा नोद करण्यात आला असुन यातील गोवश गोशाळेत जमा करण्यात आले.

हि कारवाही मा. जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, सहा. पोलीस अधिक्षक, रॉबिन बन्सल यांचे मार्गदर्शनात वडकी पोलीस स्टेशन, सपोनी भोरकडे ,पोहवा वाढई, करपते,कोष्टवार,पोना.नेवारे,पोका.मोतेराव यांनी केली.