वैभव कोटेक्स जिनिंग प्रेसिंग ऑइल मिलमध्ये मोटर व भंगार चोरी

December 17, 2025

वणी: तालुक्यातील निळापूर रोड वरील वैभव कोटेक्स प्रा. लिमिटेड जिनिंग प्रेसिंग व ऑइल मिल फॅक्टरी मधील 5HP च्या मोटरी व भंगार 16 डिसेंबर ला चोरी झाल्याचे आढळून आले.

सविस्तर माहितीनुसार निळापूर रोड वरील वैभव कोटेक्स प्रा. लिमिटेड जिनिंग प्रेसिंग व ऑइल मिल फॅक्टरी येथील काम करणारा संदीप संतोष धांडे वय 32 रा. चिखलगाव ता. वणी याने कंपनीतील क्रॉम्पटन ग्रेवीस कंपनीच्या 5 HP च्या 13 मोटरी एकूण 39,000 रू. किमतीच्या व भंगार व काही स्पेअरपार्ट चोरी करून घेहून गेला अशा स्वप्नील सुनील भंडारी वय 37 रा. वणी यांचा फीर्यादी वरून 16 डिसेंबर 025 ला संदीप संतोष धांदे विरुद्ध अप क्र. 755/25 कलम 306 भा.न्या.स.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.