टोलेबाज न्यूज :
वणी : 24 डिसेंबरला प्रभाग क्रमांक १०/११, वणी येथील टागोर चौकातील नगरपरिषदेच्या ट्यूबवेल कामाचे नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. नगरपरिषद निवडणुकीनंतरचे पहिल्या विकासकामाची सुरुवात व भूमिपूजनाचा अभिमानाचा क्षण जनतेचा साक्षीने उत्सहात पारपडला. जनतेने भाजपावर केलेल्या विश्वासाला भाजप कटिबद्ध असून निवडणुकीतील प्रत्येक शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवून पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आणि दर्जेदार विकासाला गती देण्यास भाजप कटिबद्ध राहील . ही केवळ सुरुवात असून वणीचा विकास हेच आमचे स्वप्न.
यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार, नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्याताई आत्राम, भाजपा शहराध्यक्ष अॅड. निलेश चौधरी, प्रभाग १०/११ चे नगरसेवक व मनोज सरमुकदम, भाजपा कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













