टोलेबाज न्यूज :
वणी:यवतमाळ ज़िल्यात घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशाने स्थागुशा.पथक पांढरकवडा वणी यांनी पोलीस स्टेशन वणी हददीतील चोरीचे गुन्हयाबाबत 24 डिसेंबर रोजी पेट्रोलींग करीत असताना लालगुडा परीसरात दोन संशयित फिरत असताना आढळले.
ताब्यात घेऊन विचारले असता 1) सचिन सतोष नगराळे रा बोरगाव अहेरी ह.मु. भद्रावती 2) कार्तीक शंकर साळवे रा. घुटकाळा वार्ड नेहरु शाळा चंद्रपुर असे सांगून 08 गुन्ह्याची कबुली दिली पोलीस स्टेशन वणी येथिल 07 चोरीचे गुन्हे व पोलीस स्टेशन भद्रावती जि. चंद्रपुर येथिल 01 त्याचेवर जिल्हा चंद्रपुर, भद्रावती, राजुरा, घुग्गुस, गडचांदुर तसेच जिल्हा वर्धा, यवतमाळ येथे चोरीच्या गुन्हयाची नोंद आहे त्याचेकडुन चादीचे साहित्य, होमथेएटर, टीव्ही, माईक व नगदी असा एकुण 2,03,580/- रुपयाचा मुददेमाल हस्तगत करून पुढील तपासा करीता वणी पोलीसाच्या ताब्यात देण्यात आले.
हि कारवाई पोलीस अधिक्षक कुमार चिता, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, यांचे मार्गदर्शनात पोनी सतिश चवरे स्था.गु.शा. यवतमाळ, सपोनि दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, पोहवा/सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, पोका/ सलमान शेख, रजनिकांत मडावी, चापोना सतिश फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.













