टोलेबाज न्यूज :
वणी :यवतमाळ आर्णी रोडवर भारमल हार्डवेअर सिमेंटचे दुकानातून 25 डिसेंबरचा सकाळी 9 वाजता दरम्यान दुकान उघडत असताना काउंटरवर ठेवलेली 5,42,200 रूपयाची बॅग कोणीतरी चोरून नेली साबीर हुसेन कमरूदीन भारमल यांच्या लक्षात येताच लगेच अवधूतवाडी पो. स्टे. येथे जाऊन अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र. 1655/2025 कलम 303 (3) भान्यासं. 2023 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पो. अधीक्षक कुमार चिंता व अप्पर पो. अधीक्षक अशोक थोरात यांचा आदेशानुसार उप विभागीय पो. अधि. दिनेश बैसाने यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस. स्टेशन अवधूतवाडी येथील विशेष तपास पथक तयार करून
तपास पथकाने तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे तपास करून हि चोरी तळेगाव भारी येथील दिनेश भाऊराव मंडाले वय 32 वर्ष, ठेकेदार रा. तळेगाव भारी याने केली अशा माहितीवरून 25 डिसेंबरला ताब्यात घेऊन विचारले असता त्याने गुन्हा कबुल केला चोरीतील 5,42,200 रुपये व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल, मोबाईल असा एकूण 6,32,200/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पुढील तपास पो. स्टेशन अवधूतवाडी पो. उपनि. आकाश माळगे करीत आहे.
हि कार्यवाही पो. अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पो. अधीक्षक अशोक थोरात,उप विभागीय पोअधि.दिनेश बैसाने, पोनि. सतीश चौरे स्थागुशा., पोनि. नंदकिशोर काळे पोस्टे. अवधूतवाडी, सपोनि. श्रीकांत जिंदमवार, पोउपनि. सुरज जगताप, स्थागुशा. पोउपनि. गजानन राजमल्लू यांच्या पथकाने पार पाडली.













