घरफोडीतील 1 आरोपी व 2 विधीसंघर्ष बालकासह 3,59,884 रू.मुद्देमाल जप्त “

December 27, 2025

वणी:दि. 26 डेसिम्बर रोजी स्थागुशा. पथक यवतमाळ शहरात पेट्रोलोंग करीत असतांना गुप्त माहितीच्या आधारे प्रितेश ऊर्फ दादु संजय गेडाम वय 19 वर्ष, रा. अंबिका नगर, सुराणा ले आऊट, यवतमाळ व 2 विधीसंघर्षग्रस्त बालक हे घरफोडीतील सोने व चांदीचा मुद्देमाल विकण्याकरीता सोनार लाईन परिसरात फिरतअसल्याचे कळेल.

सदर माहिती वरिष्ठांना देऊन त्यांचे मार्गदर्शनात पथक हे सोनार लाईन येथेआरोपीचा शोध घेत असतांना सदर आरोपी हे शाम टॉकीज जवळ संशयास्पद आढळून आले त्यांना पो.स्टाफ च्या मदतीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी व त्यांचे इतर साथीदारांनी पो. स्टे लोहारा हद्दीतील शुभम कॉलनी,’ राधाकृष्ण नगरी तसेच पो.स्टे अवधुतवाडी हद्दीतील दांडेकर ले आऊट, स्वप्नील नगर, व सुभाष नगर बडगांव येथे चोरी केली असून त्या गुन्ह्यातील मुद्देमाल आम्ही विक्री करीता फिरत आहे अशी कबूली दिली.

गुन्ह्याची कबूली दिल्याने त्यांचे कडून करुन पिवळ्या धातुचे सोन्याचे दागिने एकुण वजन25.100 ग्रॅम, किंमत2,51,00/-, चांदी एकुण वजन280.400 ग्रॅम, किंमत58,884/- व गुन्हा करते वेळी वापरलेली पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनीची अॅक्सेस वाहन क्र. M. H. 29 BY 9301 किंमत50,000/- रुपये असा एकुण3,59,884/- रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुन पो. स्टे लोहारा येथील 03 व पो.स्टे अवद्युतवाडी येथील 03 असे एकुण 06 गुन्हे उघड करण्यात आले. आरोपी व विधीसंघपंर्पग्रस्त बालक यांना ताब्यात घऊन पोलीस स्टेशन लोहारा येथे दाखल अप.क्र.451/2025 कलम305 (अ),331 (3),331 (4) भा.न्या.नं अन्वये नोंद करून पुढील तपास पो. स्टे लोहारा यांचे ताब्यात देण्यात आले.

हि कारवाई पोलीस अधीक्षक,, श्री. कुमार चिंता , अपर पोलीस अधीक्षक, अशोक थोरात,पोलीस निरीक्षक, स्थागुन्शा. सतिश चवरे यांचे मार्गदर्शनात सपोनि मनीष गावंडे, पोउपनि गजानन राजमलु सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.