अवैध गुटख्यावर कारवाई: 38 गुन्हे, 55 आरोपीं, 1 कोटीचावर मुद्देमाल जप्त “

December 30, 2025

वणी : पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या गुन्ह्यातिल वार्षिक आढावाची माहिती 30 डिसेंबरला पत्रकार परिषदेत दिली.2024 साली सर्व प्रकारचे गुन्हयांचे प्रलंबित प्रमाण 23% होते सदरचे प्रमाण 2025 साली 7% वर आहे.

* शरिराविरुध्दच्या गुन्हयात मागील वर्ष 2024 चे तुलनेत 2025 मध्ये19.60 % घट झाली आहे.

* ऑपरेशन प्रस्थानच्या माध्यमातुन महिलांकरीता राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे बलात्कार व विनयभंगा सारख्या गुन्हयात विशेष घट झालेली आहे.

* कम्युनिटी पोलीसींग, प्रभावी प्रतिबंधक कारवाई, तडीपार, एमपीडीए इ. कारवाईमुळे खुनाचा प्रयत्न व इतर दुखापतीचे गुन्हयांमध्ये लक्षनिय घट झालेली आहे.

* मालमत्तेच्या गुन्हयात मागील 2024 चे तुलनेत 2025 मध्ये 9% ने घट झाली आहे.

* फुटपॅट्रोलिंग, रात्रगस्त, मालमत्तेविरुध्दचे गुन्हेगारावर कारवाई इ. मुळे जबरी चोरी सारख्या Street Crime मध्ये 41 गुन्हयांनी तसेच चोरी, घरफोडी गुन्हयात लक्षनिय घट झ गालेली आहे.

* सायबर जनजागृती कार्यक्रमांमुळे फसवणुकीचे गुन्हयात घट झालेली आहे.

* मोक्का अंतर्गत कारवाई करुन 31 आरोपींविरुध्द प्रभारी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे.

* नविन फौजदारी कायदा भारतीय न्याय संहिता 2023 कलम 111 व 112 अंतर्गत संघटित गुन्हे करणा-या 4 टोळयांमधील 25 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

* सन 2025 मध्ये एमपीडीए अंतर्गत 27 प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. तसेच मपोका कलम 55 अंतर्गत 2 टोळयातील 05 ईसम व कलम 56/57 अंतर्गत 41 ईसम असे 46 ईसम यांना जिल्हयातुन हददपार करण्यात आले आहे.

* अंमली पदार्थांच्या गुन्हयात 52 आरोपीविरुध्द प्रभावी कारवाई करुन 34 गुन्हयात गांजा व एमडी अंमली पदार्थ48,31,942 /- रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला.

* शस्त्र अधिनियमा अंतर्गत अवैध अग्निशस्त्रा संबंधाने 24 आरोपींविरुध्द कारवाई करुन 20 गुन्हे दाखल करण्यात आले. (25 अग्नीशस्त्र व 384 काडतुसे) तर अवैध शस्त्रासंबंधाने 147 ईसमांवर कारवाई करुन 137 गुन्हे दाखल केले.

* सन 2025 मध्ये अवैध गुटख्यामध्ये 55 आरोपींवर कारवाई करुन 38 गुन्हे दाखल करण्यात आले व 1,19,32,494/- रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला

* सन 2025 मध्ये अवैध वाळुमध्ये 281 आरोपींवर कारवाई करुन 205 गुन्हे दाखल करण्यात आले व 3,13,84,337/- रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला.

* सन 2024 अखेर 1076 हरविलेले महिला व पुरुष मिळुन येणे बाकी होते. सन 2025 मध्ये 1959 महिला व पुरुष हरविले आहे. असे एकुण 3035 महिला व पुरुषांपैकी सन 2025 मध्ये 2396 ईसमांचा शोध घेण्यात आला असुन 2025 अखेर मिळुन येणे बाकी असलेले महिला व पुरुष 639 इतके आहे.एकंदरीत मागील वर्षीच्या तुलनेत ऑपरेशन शोध मोहिम राबवुन हरविलेल्या महिला व पुरुषांचा मोठ्या प्रमाणात शोध घेण्यात आला आहे.