टोलेबाज न्यूज :
वणी: वणी शहरात प्रथमचभव्य शेतकरी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन 4 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता शासकीय मैदान वणी येथे भव्य शेतकरी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दि.30 डिसेंबर रोजी दुपारी स्थानिक विश्रामगृह वणी येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. मेळाव्यामुळे शेतकरी चळवळीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.वणी येथील काही उत्साही शेतकरी संघटना, किसान सभा व प्रहार संघटनेच्या नेत्यांनी एकत्र येवून महाएल्गार शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्रातीलदिग्गज नेत्यांना निमंत्रित करण्यात आले असून डबघाईस आलेल्या शेतीव्यवस्था व राजकारण याविषयावर अभ्यासपूर्ण चर्चा करून आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्या बाबत पाऊल उचलण्यात येणार आहे. या मेळाव्याला माजी मंत्री बच्चूभाऊ कडू, नितीनकराळे, शेतकरी नेते वामनराव चटप, प्रकाश पोहरे, संपादक देशोन्नती डॉ. अजित नवले राजुभाऊ शेट्टी?. रविकांत तुपकर महादेव जानकर, रघुनाथ दादा पाटील राजन क्षीरसागर, अनिल घनवट यासह विविध सामाजिक व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी मोठ्यासंख्येने उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक सतीश देरकर, अनिल घाटे, देवराव धांडे, दशरथ पाटील बोबडे, अनिल गोवारदिपे, प्रहार संघटनेचे मोबिन शेख, रघुवीर कारेकर सय्यद अहमद, यांनी केले.













