टोलेबाज न्यूज :
वणी: शहरात मोठ्या प्रमाणात सरू असलेले अवैध धंदे तत्काळ बंद करणेबाबत व औद्यागिक कंपन्या तसेच कोळसा वारणींमध्ये स्थानिक युबकांना रोजगार देण्याबाबत. व वणी शहर व परिसरामध्ये विविध प्रकारचे अवैध व समाजविघातक धंदे अत्यंत बिनधास्तपणे सुरू आहेत, विशेषतः सुरगंधित तंबाख्ू विक्री, गांजा व ड्रग्स विक्री, सट्टापट्टी व्यवसाय तसेचे अवैध रेती तस्करी यांचा व्याप मो्ठया प्रमाणात वाढलेला आहे.
या अवैध धंद्यांमुळे अनेक कुटंब उद्ध्वस्त होत असून युवक व विद्यार्थी वर्ग चुकीच्या मार्गाकडे वळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच सुगीधित तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा, जीभेचा व अन्नलिकेचा कर्करोग होण्याचे प्रमाण झपाट्यान वाठत असून ही बाब अत्यंत चिंताजनक अहे.
तसेच वरणी परिसरातील औद्योगिक कंपन्या व कोळसा खणामध्य स्थानिक युवकांना डावलून बाहेरील कामगारांना प्राथान्य दिले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी स्थानिक बेरोजगार युवक रोजगाराच्या संधीपासून वंचित राहत असून सामाजिक असंतोष वाढत आहे. स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार देण्यासाठी योग्य नियोजन व सक्तीची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे. शिवसेना पक्ष व यु्ासेना यांच्या वतीने याबाबत यापूर्वीही संबंधित विभागांकड़े अनेक वेळा निवेदने सादर करण्यात आली आहेत, मात्र आद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
त्यामुळे नागरिकांमध्य तीव्र नाराजी निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपणांस नम्र विनंती आहे की, वणी शहर व परिसरात सुरु असलेल्या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर तात्काळ बंद करून कठोर कारवाई करण्यात यावी. औद्योगिक कंपन्या व कोळसा खाणणीमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार देण्याबाबत स्पष्ट आदेश निर्गीमित करून सदरचे निवेदन युवा शिव सेना शिंदे गट प्रतीक गौरकर यांचे वतीने कार्यकर्तासह उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांना देण्यात आले.













