यवतमाळ पोलीस दलातफे एकुण १४ गुन्हयातील ५३७.७७९ किलो ग्रॅम (गांजा) अंमली पदार्थाचा करण्यात आला नाश.

यवतमाळ पोलीस दलातफे एकुण १४ गुन्हयातील ५३७.७७९ किलो ग्रॅम (गांजा) अंमली पदार्थाचा करण्यात आला नाश. विशेष पोलीस महानिरीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकड़ील पत्रानुसार एन. डी. पी. एस कायद्यान्वये दाखल गुन्हयातील अंमली पदार्र्थ नाश करणे करीता विशेष मोहिम राबविणेबाबत आदेशीत केले होते,

यवतमाळ जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हयातील जप्त (गांजा) अंमली पदार्थ नाश बाबतचे एकुण 14 गुन्हयांमध्ये मा. न्यायालयाचे अंतिम आदेश झाले होते. त्याअनुषंगाने सर्व कारयदेशिर प्रक्रिया पार पाडुन महाराष्ट्र प्रदुपण नियंत्रण मंडळ यांची परवांगीने दिनांक 01/10/2025 रोजी M/s Mahaashtra Enviro power Limited, Plot No CHW-01 MIDC Butibori, District Nagpur येथे 14 गुन्ह्यातील एकुण एकत्रीत वजन 537.79 किलो ग्राम (गांजा) अंमली पदार्थ DRUG DIPOSAL COMMITTEE यांचेकड्न पंचासमक्ष नाश/ भस्मीकरण करण्यात आला आहे.

दरवर्षी 26 जुन हा दिवस जागतीक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणुून पाळला जातो. नशेमध्ये अडकलेल्या एखादयाच्या शारिरीक आणि माणसिक आरोग्यावर कसे दुष्परिणाम होतात व एखादया व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य कसे बिघड़ु शकते, अशा नशेत आहारी गेलेल्या लोकांचे जिवन वाचवणे, प्रत्येक व्यक्ती, मुले, मुली यांच्या मध्ये जागरुकता करणे हा या दिवाचा मुळ उद्देश आहे. सदरची कारवाई ही DRUG DPOSAL coMMITTEE चे अध्यक्ष मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ श्री, कुमार चिता, सदस्य अपर पोलीस अधीक्षक श्री, अशोक थोरात, सदस्य प्र. पोलीस उपअधीक्षक श्री. सुनिल हुड यांचे माग्गदर्शनात पो.नि. श्री. सतिश चवरे, स्था.गु.शा. यवतमाळ, वाचक स.प्पे.नि. श्री. मनिष गावंडे व अंमली पदार्थ विरोधी कक्षातील अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

उमरखेडात घरफोडी मालिका उघडकीस; दोन चोरटे जेरबंद, २ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

उमरखेड शहर व परिसरात झालेल्या घरफोड्यांच्या मालिकेचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या डिटेक्शन बेंच (डीबी) च्या कसून तपासातून दोन घरफोड्या करणाच्या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या कडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण २ लाख ८३ हजार २६० रुपयांचा मू्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फियादी सौ. रेखा दत्ता खरुसकर (रा. महात्मा फुर्ले वार्ड, उमरखेड) यांच्या घरात १० जुले रोजी मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश करून १० हजार रुपये व ६ ग्रेमचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी केले होते, या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल तपासणी व सायबर सेलच्या तांत्रिक विश्लेषणातून पोलिसांना आरोपींचा माग काढता आला. या प्रकरणात अर्जुन उत्तम कनकापुरे (३२, रा. ब्राम्हणगाव, ता. उमरखेड) यास अटक करण्यात आली. चौकशीत त्याने चोरीचा मोबाईल व दागिने साथीदार अरिहंत उर्फ संतोष दत्तात्रय कस्तुरे (४२, रा. ब्राम्हणगाव, ता. उमरखेड) याला दिल्याचे सांगितले. त्यालाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता उमरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण चार घरफोड्यांचे गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यातून ९ मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा २.८३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही यशस्वी कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक मा.कुमार चिंता, अप्पर अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमान गायकवाड, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, पोलीस निरीक्षक यशोथरा मुनेश्वर तसेच सायबर सेल यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत डिबी प्रमुख पोउपनि सागर इंगळे, पोहेका मधुकर पवार, पोशि संघशील टेंभरे, चालक पोशि सुनिल ढोंबरे, पोशि महारुद्र, डिबी टिम पो.स्टे. उमरखेड यांनी योगदान दिले. तसेच सायबर सेल यवतमाळचे मपोशि पुजा भारस्कर, पोशि सचिन देवकर यांनी महत्वाची भूमिका बजावली.सदर गुन्ह्माचा पुढील तपास पोउपनि सागर इंगळे, पोलीस स्टेशन उमरखेड करीत आहेत.

शिवसेना शिंदे गट मारेगाव शहर कार्यकारिणी गठित

सदर कार्यक्रमात मारेगाव शहरासाठी शहर उपप्रमुख व शहर विभाग प्रमुख यांची तालुका प्रमुख विशाल किन्हेकर व मारेगाव शहर प्रमुख विजय मेश्राम यांच्या सान्निध्यात निवड करण्यात आली असून प्रविण साईबाबा बोबडे यांची १ ते ९ प्रभाग क्रमांक साठी उपशहर प्रमुख तर गणपत चोखाजी वाढई यांची १० ते १७ प्रभाग क्रमांक साठी मारेगाव उपशहरप्रमुख पदी निवड करण्यात आली असून विभाग प्रमुख म्हणून १,२,३,४ या प्रभाग करिता मोहन दौलत किन्हेकार ५,६,७,८ या प्रभाग क्रमांक करिता विठ्ठल नानाजी गेडाम प्रभाग क्रमांक९,१०,११,१२ करिता उमेश उत्तम उलमाले व १३,१४,१५,१६ व १७ प्रभाग क्रमांक करिता आनंद पद्माकर नक्षणे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी शहरात किंवा बुथ वर पक्ष संघटन वाढविण्यासाठी करण्यात आली असून यांचा पदाचा काळ हा एक वर्षासाठी असून यांच्या कार्यकाळातील कार्य पाहून पक्षश्रेष्ठी पुढील पदोन्नतीसाठी विचार करणार आहे.

“ऑपरेशन प्रस्थान” उपक्रमाचे मुख्यमंत्र्याकडून कौतुक

यवतमाळ : जिल्हा पोलीस विभागाकडून ऑपेरेशन प्रस्थान हा कार्यक्रम राबविला गेला. यामध्ये महिला सक्षमीकरण, आत्मसुरक्षा कारणास्तव महिलांना कराटे प्रशिक्षण, आदर्श दुर्गा उत्सव स्पर्धा राबविण्यात आल्या.

त्याचे सादरीकरण प्रत्यक्ष पाहिल्या नंतर मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ पोलिसांचे कौतुक केले सोबतच अतिवृष्टीने ओढवलेली पूर परिस्थिती ज्यामध्ये राज्यासह जिल्ह्यात शेतकऱ्यांची झालेली पीक नासाडी, घरादाराचे, नुकसान यामुळे उध्वस्थ झालेले कुटुंब यानुसार सामाजिक बांधिलकी जपत त्यांना मदत करणेकरिता.

यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांनी पोलीस विभागात कार्यरत पोलिस अधिकारी, पोलीस अंमलदार यांना ता. 27/09/25 ला पोलिस निधी गोळा करणे करिता आव्हाण केले व अवघ्या 24 तासात यवतमाळ जिल्हा पोलीस विभागाने 27, 11,111 रु.सत्तावीस लाख अकरा हजार एकशे अकरा रु.जमा केले व पूरग्रसतांच्या मदतीला हातभार लावत मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून 27,11,111 रु चा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे सुपूर्द केला.

घुग्गुस हायवे ब्राह्मणी फाट्याजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला

वणी : दि. 29 सप्टेंबर सोमवार दुपारी 2 वाजेच्या सुमारास ब्राह्मणी फाटा घुगुस हायवे लगत शिव मंदिराच्या मागे एका अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटना अंदाजे चार-पाच दिवस आधी झाल्याचे कळते,

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून शव उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण हत्या की आत्महत्या अजून कळले नाही. शव उत्तरीय तपासणीनंतर स्पष्ट होईल या प्रकरणाचा अधिक तपास वणी चे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

भगवंताला आवडणाऱ्या कार्याचा सेट-अप बिघडला की माणूस अप-सेट होतो. ह.भ.प. श्रेयस बडवे महाराज

वणी: वणी येथील जगद आई म्हणजे जैताई मंदिरात परंपरेनुसार सुरु असलेल्या चार दिवशीय कीर्तन सेवेपैकी तिसऱ्या दिवशी ते, “हेची थोर भक्ती आवडते देवा | संकल्पावी माया संसाराची || या संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगावर निरूपण करीत होते.

आपले प्रत्येक कार्य करतांना मी जे करीत आहे ते भगवंताला आवडायला हवे, असं नव्हे. खरे तर जे भगवंताला आवडते तेच कार्य मी करायला हवे. भगवंताला आवडणाऱ्या कार्याचा सेट-अप बिघडला तर माणूस अप-सेट होतो.म्हणून मानवाच्या हातून भगवंताला आवडणारेच कार्य घडायला पाहिजे. संतांनी मानवाला उपदेश करताना कधीही कंटाळा केला नाही. उलट त्याचा उद्धार होईपर्यंत त्याचा पाठपुरावा केला, कारण समोरच्या जीवाची माया दूर करणे हेच त्यांचे कार्य होते आणि अशी माया सुटणे यालाच थोर भक्ती म्हणतात.” असे विचार पुणे येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्रेयस महाराज बडवे यांनी व्यक्त केले.

      

माधव सरपटवार यांच्यावरील “माझे जीवन गाणे” पुस्तकाचे प्रकाशन

वणी:सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा श्री जैताई मंदिर नगर, वाचनालयाचे अध्यक्ष माधवरावसरपटवार ह्यांना सन २०२५चा जैताई मातृगौरव पुरस्कार प्राप्त झाला. याच सोहळ्यात यांच्यावरील“माझे जीवनगाणे” ह्या पुस्तकाचेथाटात  प्रकाशन झाले. दैनिक तरुण भारतचेमुख्य संपादक शैलेस पांडे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, ख्यातनाम बांधकामव्यावसायिक आशुतोष शेवाळकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नागपूर येथील प्रसिद्धडॉ. सौरभ बरडे, विद्यावाचस्पती स्वानंद पुंड, पुस्तकाचे संपादक सुनील इंदुवामनठाकरे आणि सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया प्रामुख्याने उपस्थित होते.     

या पुस्तकाला ख्यातनाम साहित्यिक तथा पत्रकार शैलेश पांडे ह्यांची प्रस्तावना आहे. त्यांनी त्यावर भाष्य केले. संपादक सुनील इंदुवामन ठाकरे ह्यांनी या पुस्तकाची निर्मितीप्रक्रिया विषद केली. ही शैलेश सरपटवार, शर्वरी सरपटवार, राम बीडकर आणि शिल्पा बीडकर ह्यांची निर्मिती असूनप्रकाशक विदर्भ साहित्य संघ, वणी शाखा आहे. मुखपृष्ठ सागर मुने ह्यांचं तर मलपृष्ठ गुरुदत्त बीडकर ह्यांचं आहे. आतील पेन्सील रेखाटन हर्षदा सरपटवार ह्यांचं आहे.मांडणी व सजावट मंगला बक्षी ह्यांची असून निर्मिती प्रमुख भारती सरपटवार आहेत.

प्राचार्यराम शेवाळकर, संजय इंदुरकर, ग्यानचंद भंडारी, अरुणकुमार खैरे, डॉ. श्रीकांतगोडबोले, कोल्हापुरचे राम देशपांडे आदींचे यात लेख आहेत. तसेच महाकवी सुधाकर गायधनी, वनराईचे गिरीश गांधी, प्राचार्य शिरीषदादा कवडे, ना. गो. थुटे, मधुकर सवरंगपते, आशुतोष अडोणी, ब. ना. एकबोटे, वीणा हरदास, प्रा. प्रणिता भाकरे, विनयकोंडावार,  प्रा. रवींद्र साधू, ना. ना.देशपांडे, नरसिंह बेलसरे, दादा घाटोड, नारायण जोशी, डॉ. लक्ष्मण जिवने, केशवआवारी, मीनाक्षी गोरंटिवार आदिंच्या पत्रव्यवहारांचा यात समावेश आहे.

डाखरे गुरुजी, गरुदत्त आणि देवदत्त बिडकर,  सोबतच गौतम सुत्रावे, नीलकृष्ण देशपांडे, स्मिता गोरंटिवार,जया मीनल अनिल रोहणकर, सुभाष व सुनीता देशमुख आदींनी काव्यांतून भावना व्यक्तकेल्या आहेत. कार्यक्रम संयोजन सागर मुने ह्यांनी केलं. यावेळी बहुसंख्यस्नेही, रसिक उपस्थित होते. प्रास्ताविक भूमिका प्रा.स्वानंद पुंड यांनी मांडली.आभार प्रा. चंद्रकांत अणे ह्यांनी मानलेत.

०००००००००००००००००००

न्यू युवा महिला दुर्गा उत्सव मंडळ वणी तर्फे गोंधळा चा कार्यक्रम संपन्न

वणी :न्यू युवा महिला दुर्गा उत्सव मंडळ बँक कॉलनी येथे ता.27/09/25 ला गोंधळाचा कार्यक्रम घेण्यात आला.हिंगणघाट येथील रवि मोरणकर हे कार्यक्रमाचे आकर्षक ठरले. ते आई तुळजा भवानी चे मोठे भक्त असून त्यांनी वणी मध्ये येऊन कार्यक्रम संपन्न केला आहे व सोबतच रांगोळी स्पर्धेचे पण आयोजन केले गेले. मांडलाच्या अध्यक्षा सौ कुंदा मोरेश्वर सावसाकडे,उपाध्यक्षा सौ लता पाटणकर,सचिव सौ अमृता संदीप चट्टे यांचे पुढाकाराने कार्यक्रम यशवी झाला. त्या बद्धल त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

भव्य आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा २९ सप्टेंबरला वणी शहरात

वणी: महाराष्ट्रात वारंवार आदिवासी आरक्षणावर घुसखोरीचे प्रयत्न होत असल्याने मूळ आदिवासी समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. सध्या बंजारा व धनगर समाज हैदराबाद गॅजेटचा दाखला देत आदिवासी समाजात समाविष्ट करण्याची मागणी करीत असून शासनावर दबाव आणण्यासाठी ठिकठिकाणी मोर्चे आंदोलन सुरू आहेत.

मात्र, बंजारा व धनगर समाज हे आदिवासी नसून त्यांना स्वतंत्र आरक्षणाचा लाभ आधीपासून दिलेला आहे. तरीदेखील आदिवासींमध्ये समाविष्ट करून आरक्षण मिळविण्याची मागणी हा भारतीय संविधानाचा भंग करणारा व संविधानाबाह्य निर्णय ठरेल, असा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे.

आधीच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय दृष्ट्या कमकुवत असलेल्या आदिवासी समाजाचे हक्क हिरावले जाणार असल्याने आदिवासी हक्क व आरक्षण बचाव कृती समिती वणी, झरी, मारेगाव तसेच विविध आदिवासी संघटनांच्या नेतृत्वाखाली २९ सप्टेंबर २०२५ रोजी सोमवारला दुपारी १२ वाजता वणी शहरात भव्य आरक्षण बचाव आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या अस्तित्वाचे आणि हक्काचे रक्षण करण्यासाठी आदिवासी समाजाने एकत्र यावे, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.

रास गरबा मधून माँ अंबेची आराधना

जनहित कल्याण महिला संघटनेच्या गरबा उत्साहात रंगत;

मारेगाव :नवरात्रोत्सवा च्या पावन पर्वावर जनहित कल्याण समितीचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांच्या सौजन्याने जनहित कल्याण महिला संघटनेतर्फे नगरपंचायत प्रांगणात शिवगर्जना दुर्गोत्सव मंडळा देवीसमोर भव्य रास गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. महिलांनी गरब्याच्या तालावर नृत्य सादर करत माँ अंबेची भक्तीमय आराधना केली.

नवरात्र उत्सव म्हणजे स्त्री सत्ताक संस्कृतीचा उत्सव. याच भावनेतून मारेगावमध्ये आयोजित या उत्सवात महिलांचा व लहान मुलींचा उत्साह पाहण्यासारखा होता. चार गटांमध्ये घेण्यात आलेल्या या गरबा स्पर्धेत सहभागींसाठी आकर्षक बक्षिसांची रेलचेल ठेवण्यात आली आहे. त्यात इलेक्ट्रिक स्कुटी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, लॅपटॉप, अँड्रॉइड मोबाईल, बायसिकल अशा मोठ्या बक्षिसांसोबतच सिल्वर कॉइन, पैठणी साडी, हेडफोन आणि लहान मुलींसाठी विशेष गिफ्ट्स चा समावेश आहे.

या बक्षिसांमुळे महिलांचा व मुलींचा उत्साह आणखी उंचावला असून, मोठ्या संख्येने त्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून देवीचा गजर करत उत्सवाला रंगत आणली.
गरबा प्रशिक्षक विकास यांनी महिलांना शिस्तबद्ध पद्धतीने गरब्याचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या मेहनतीमुळे सादरीकरणाला विशेष उठाव मिळाला. दरम्यान, सतत कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवरदेखील महिलांचा उत्साह द्विगुणित झाला होता. शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमादरम्यान पावसाने थोडी विश्रांती दिल्याने उत्सव निर्विघ्न व भव्यदिव्य पार पडला.

नगरपंचायत प्रांगणात भरलेल्या या रास गरबा उत्सवामुळे नवरात्रोत्सवाचे पर्व भक्तिमय, उत्साही आणि आनंददायी वातावरणात साजरे झाले.