•शहीद पोलीस अधिकारी व कर्मचारी हुतात्म्यांना मानवंदना अर्पण
टोलेबाज न्युज :अभय गावंडे
वणी : मा. पोलीस महासंचालक म. रां. मुंबई यांचे 16/10/2025चे पत्रान्वये 01 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी हुतात्म्यांना मानवंदना करण्याचे आदेशावरून पोलीस मुख्यालय यवतमाळ येथे 21 ऑक्टोंबर 2025 ला सकाळी 8 वाजता पोलीस स्मृती दिन पाळण्यात आला.सदर कार्यक्रमास प्रभारी पोलीस अधीक्षक मा. अशोक थोरात यांनी पोलीस स्मृति दिनाबाबत 191 जवानांनी आपले कर्तव्य बजावत असताना मातृभूमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिलेली आहे त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी म्हणून स्मृतीस विनम्र अभिवादन केले व हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून परेड कमांडर यांनी शोक परेडच्या कारवाई दरम्यान 03 ब्लॅक राउंड फायर केले.कार्यक्रमास श्री दिनेश बैसाणे उपविपो अ, श्री सुनील हूड प्र. पोउपअधीक्षक (मुख्या)पो. नि. देवकते, रामकृष्ण जाधव, मोपवि अधिकारी सावंत,रापोफौ मतीन शेख, सेवानिवृत्त अधिकारी दुबे,आसुटकर, महेश मास्तर, तिवारी मास्तर, हरणखेडे मास्तर, आवटे, देवगीरकर, पोलीस मित्र शर्मा, पोलीस हॉस्पिटल वैद्यकीय अधिकारी धुर्वे, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी, मंत्रालय लिपिक इतर वर्ग प्रामुख्याने सर्वांची उपस्थिती होती.
•शहीद पोलीस अधिकारी व कर्मचारी हुतात्म्यांना मानवंदना अर्पण
टोलेबाज न्युज :अभय गावंडे
वणी : मा. पोलीस महासंचालक म. रां. मुंबई यांचे 16/10/2025चे पत्रान्वये 01 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी हुतात्म्यांना मानवंदना करण्याचे आदेशावरून पोलीस मुख्यालय यवतमाळ येथे 21 ऑक्टोंबर 2025 ला सकाळी 8 वाजता पोलीस स्मृती दिन पाळण्यात आला.
सदर कार्यक्रमास प्रभारी पोलीस अधीक्षक मा. अशोक थोरात यांनी पोलीस स्मृति दिनाबाबत 191 जवानांनी आपले कर्तव्य बजावत असताना मातृभूमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिलेली आहे त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी म्हणून स्मृतीस विनम्र अभिवादन केले व हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून परेड कमांडर यांनी शोक परेडच्या कारवाई दरम्यान 03 ब्लॅक राउंड फायर केले.
कार्यक्रमास श्री दिनेश बैसाणे उपविपो अ, श्री सुनील हूड प्र. पोउपअधीक्षक (मुख्या)पो. नि. देवकते, रामकृष्ण जाधव, मोपवि अधिकारी सावंत,रापोफौ मतीन शेख, सेवानिवृत्त अधिकारी दुबे,आसुटकर, महेश मास्तर, तिवारी मास्तर, हरणखेडे मास्तर, आवटे, देवगीरकर, पोलीस मित्र शर्मा, पोलीस हॉस्पिटल वैद्यकीय अधिकारी धुर्वे, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी, मंत्रालय लिपिक इतर वर्ग प्रामुख्याने सर्वांची उपस्थिती होती.
वणी : एकीकडे वणीमध्ये सगळीकडे अतिक्रमण असतांना फक्त न्यायालय लगत बाहेर परिसरातील अतिक्रमण धारकांची छोटी दुकाने काढण्यात आल्यामुळे अनेक अतिक्रमणधारकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी संबंधित जिल्हा न्यायाधीशांकडे तसेच नगरपालिका मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण उप विभाग, यांच्याकडे तक्रार निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी परिवारासकट आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. वणी दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्याचा कडेला लहान लहान तात्पुरते दुकाने टाकून व्यवसाय करीत आहेत. वणी येथे न्यायालय, तहसील कचेरी, पोलिस स्टेशन, पंचायत समिती व अन्य कार्यालय एकच ठिकाणी असल्याने तालुक्यातील नागरिक विविध कार्यासाठी हजारोंच्या संख्येने दररोज येजा करित असतात. त्यामुळे परिसरात सर्वच कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी, पक्षकार, त्याचप्रमाणे आलेली तालुक्यातील जनता यांना या परिसरात रस्त्याचा कडेला लावलेल्या छोट्या तात्पुरत्या दुकानदारांकडून सेवा पुरविल्या जात आहे. देशभरात उच्चशिक्षितांनाच शासनाकडून रोजगारांना संधी उपलब्ध होत नसल्याने देशात प्रचंड बेरोजगारीने थैमान घातले असतांना आपल्या परिवाराचे गुजराण करण्यासाठी फुटपाथवर रस्त्याचा कडेला छोटे दुकान लावून बेरोजगार आपला स्वतःचा स्वयंरोजगार प्रामाणिक व्यवसाय करीत आहेत. हा प्रकार फक्त वणी येथेच नसून संपूर्ण देशभरात आहे. त्यामुळे नाईलाजास्तव प्रशासन सुद्धा ह्याकडे दुर्लक्ष करीत असते. परंतु समाजामध्ये असेही काही विधवान लोक असतात ज्यांना बेरोजगारापाई चुकीचे व्यवसाय केलेले चालतात.परंतु प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे चालत नाहीत. हाच प्रकार न्यायालय परिसरात सुरू असलेल्या गरीब छोट्या दुकानदाराचा व्यवसायावर बुलडोझर फिरवून त्यांचा रोजगार हिरावून घेण्याचा विघ्नसंतोषी कार्य न्यायालयातील काही निवडक वकील यांचे कडून वारंवार नेहमी तक्रार केल्या जात आहे. दुसरीकडे त्याच ठिकाणी अक्षरशः रस्त्यावर काही निवडक वकील मंडळी आपली दोन चाकी, चार चाकी वाहने ,उभी करून नो पार्किंग झोन नियमांचे उल्लंघन करीत रस्त्यावर अडथळे उभे करण्याचा प्रयत्न सत आणि सातत्याने करीत असतात. त्यामुळे हा प्रकार पूर्णपणे फुटपाथ धारकावर भेदभाव करणारा ठरत आहे. नगरपरिषद,सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण उप विभाग,प्रशासन ह्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. न्यायालय परिसरातील अतिक्रमण करून स्वयंरोजगार करणाऱ्या व्यावसायिकांनी संबंधित जिल्हा न्यायाधीश, आमदार संजय दरेकर, न. प. मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम अभियंता, पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण उप विभाग, यांना निवेदन देऊन “व्यवसाय करू द्या अन्यथा रोजगार द्या, अतिक्रमण हटविण्यापूर्वी पर्यायी जागा उपलब्ध करून द्या “, आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्या पूर्ण न केल्यास परिवारासकट आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून न्यायालय परिसरा बाहेरिल फुटपाथ व्यवसाय करणारे सुरेश शेंडे, कौसर अली, रिना नंदुराव जुमनाके, नानाजी येसेकार, प्रभाकर पोटे, माया पचारे, किसन उमाटे, आबा बागडे, रामभाऊ कामटकर, आकाश बोथकर, रामचंद्र बोरपे, संजय गुरफोडे, सोहेल खान पठाण यांनी दिला आहे.
वणी : येथील वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्यात आली. शाळेचे प्राचार्य श्री राकेश कुमार देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुमारे 500 विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सृजनशक्तीला चालना देत आकाश कंदील बनविणे, रांगोळी स्पर्धा, वर्ग खोली सजावट अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालयाच्या शिक्षिका सौ. टोंगे मॅडम,कु.भाग्यश्री लांडे मॅडम आणि सौ. बलकी मॅडम उपस्थित होत्या. उत्सवादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक श्री देशपांडे सर यांनी आपल्या मार्गदर्शीय भाषणात जगभरातील शहरे वाढत्या प्रदूषण पातळीशी झुंजत असताना, पर्यावरणपूरक दिवाळी निवडल्याने आरोग्याचे रक्षण होते, हे सांगितले. श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव श्री ओम प्रकाश जी चचडा तसेच व्यवस्थापन मंडळ सदस्य श्री विक्रांत जी चचडा यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी एकमेकांना तसेच शिक्षकांना मिठाई देत कार्यक्रमाचा गोडवा वाढवला. कार्यक्रमास सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
वणी : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) निलजई प्रकल्पात स्थानिक युवकांना रोजगारापासून वंचित ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वणी तालुका तर्फे 16 ऑक्टोबर 2025 रोजी ठिया आंदोलन व 17 ऑक्टोबर 2025 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ज्यांच्या जमिनीवरून कंपनी कोळसा काढते, त्याच भूमीतल्या युवकांना रोजगार न देणे हा अन्याय आहे. काही जमिनीधारकांना नोकऱ्या देण्यात आल्या, परंतु भूमिहीन शेतमजूर युवकांना पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले. या सामाजिक व आर्थिक अन्यायाविरुद्धच हा संघर्ष उभारण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड अनिल हेपट(वणी विधानसभा क्षेत्र), कॉम्रेड अनिल घाटे (जिल्हा सचिव), कॉम्रेड मोरेश्वर कुंटलवार (तालुका सचिव) कॉम्रेड अथर्व निवडींग (AISF जिल्हा प्रमुख), पंढरी मोहितकर, भास्कर बकली, संभाशिव ताजने, संतोष तीतरे, यांनी केले. आंदोलनादरम्यान “स्थानिकांना रोजगार द्या — बाहेरच्यांचा हस्तक्षेप थांबवा!” या घोषणांनी परिसर दुमदुमला. पोलीस प्रशासनाने दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण कॉम्रेड अनिल हेपट यांनी ठाम शब्दांत सांगितले — ‘मागण्या मान्य करा, अन्यथा आमच्यावर गुन्हे दाखल करा; पण लढा थांबवणार नाही!’ शेवटी प्रशासनाला झुकावे लागले आणि स्थानिक युवकांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने स्पष्ट केले आहे की — स्थानिकांना रोजगार देणे हा दयेचा नव्हे, हक्काचा प्रश्न आहे. हा लढा पुढेही सुरू राहील.
•जनतेस सायबर गुन्ह्याच्या फसवणुकी पासून सावध राहण्याचे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केले
टोलेबाज न्युज :अभय गावंडे
वणी :सायबर ठगीचा गुन्ह्यात भारत सरकार NCCRP या पोर्टलचा फार महत्वाचा व स्तुत्य उपक्रम असून ज्या लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झालेली आहे, अशा तक्रारीची या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने त्वरित नोंद करण्यासाठी केली जाते.यवतमाळ ज़िल्हयतिल फसवणूक झालेल्या तक्रारदारांना यवतमाळ ज़िल्हा पोलीस दलातर्फे NCCRP या पोर्टल द्वारे नोंद केलेल्या तक्रारीचा माध्यमातून 42 तक्रारदारांना 15 लाख रुपये मा. श्री रामानाथजी पोकळे साहेब, विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आले.
या पोर्टलचा उपयोग व वापर 2019 पासून केला जातो तसेच 2023 पासून या पोर्टलचा प्रभावीपणे वापर केला जात असून 2023 मध्ये एकूण 1055 तक्रारी प्राप्त झाल्या असून 39 लाख रुपये होल्ड करण्यात आले व 2024 मध्ये 1956 तक्रारी नोंद झाल्या असून 4 करोड रुपये होल्ड करण्यात आले व 2025 मध्ये 1585 तक्रारी प्राप्त झाल्या असून 90 लाख रुपये होल्ड करण्यात आले तसेच होल्ड केलेली रक्कम कोर्ट प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर तक्रारदार यांच्या स्वाधीन करण्यात येणार असून NCCRPया पोर्टलचे टीम PI. मुनेश्वर, GPSI डेरे,अविनाश सहारे 86 यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
कार्यक्रमा करीता श्री. रामनाथजी पोकळे साहेब, विशेष मोलीस महानिरिक्षक, अमरावती परिक्षेत्र, यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात , सोबत ASP पुसद श्री. बी. जे. हर्षवर्धन , ASP पांढरकवडा श्री. बन्सल , उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा श्री. भोरे , उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ श्री. बैसाणे , उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड, श्री. गायकवाड , प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी, मुख्यालय, श्री. हुड , सर्व शाखा प्रमुख अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच तक्रारदार सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पोनि श्रीमती यशोदरा मुनेश्वर मँडम, सायबर पोलीस स्टेशन यांनी केले.
•यवतमाळ च्या रस्त्यावर एकदा परत रक्ताची शाही उडाली !
•प्रश्न एकच, गुन्हेगार आणखी किती दिवस रस्त्यावर मोकाट फिरणार ?
टोलेबाज न्युज :अभय गावंडे
वणी; यवतमाळ — गुन्हेगारीच्या नकाशावर अजून एक ठिपका! आज दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी अशोकनगर ते पाटीपुरा रोडवर धक्कादायक घटना घडली. TVS कंपनीच्या ऍक्सेस दुचाकीवर ट्रिपल सीट फिरत असताना अचानक सगळ्यात मागे बसलेल्या इसमाने मधोमध बसलेल्या सज्जाद शेख यांच्या पोटात धारदार चाकूने वार केला!
वार एवढा भेदक होता की सज्जाद जागीच कोसळला! जिवाच्या आकांतात भावाने दवाखान्याचा रस्ता धरला, पण नियतीने साथ दिली नाही — डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहर पोलीस ठाण्यात मृताच्या भावाने तक्रार दाखल करताच गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखा व यवतमाळ पोलीस आरोपीच्या मागावर आहे .
वणी : यवतमाळ जिल्हयात् दिनांक 22/09/2025 ते दि. 01/10/2025 पावेतो दुर्गा उत्सव साजरा करण्यात आला. आदर्श नवदुर्गा उत्सव हा जनताभिमुख व्हावा या उददेशाने यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री. कुमार चिंता साहेव यांचे संकल्पनेतून यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत सन २०२५ मध्ये आदर्श नवदुर्गा उत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आदर्श दुर्गा उत्सव स्पर्धा मध्ये एकूण एकूण 3817 मंडळांनी सहभाग घेतला, त्यामध्ये 3203 दुर्गा मंडळ व 614 शारदा मंडळ सहभागी झाले होते.
आदर्श गणेश मंडळ स्पर्धे करिता-1) दुर्गा स्थापना व विसर्जन मिरवणूक डीजे मुक्त, 2) पारंपरिक वाद्याचा वापर, 3) रहदारी मध्ये अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन मंडप उभारणी, 4) अमली पदार्थ दारू नशा यावर नीर्वध, 5) सामाजिक उपक्रम रक्तदान, आरोग्य शिबीर, वृक्षरोपण, व्यसनमुक्ती राबविणे, 6) सीसीटीव्ही व्यवस्था, परिसर स्वच्छता, 7) ज्येश्ठ नागरीक महिलांचा सहभाग, 8) शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसार 9) सामाजिक संदेश देणारे देखावे. 10) नैसर्गीक व पर्यावरण पुरक साहित्याचा वापर. हे सर्व निकष पूर्ण करण्यात आलेल्या मंडळाना आदर्श नवदुर्गा उत्सव मंडळ स्पर्धा करीता जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली.
पुढील प्रमाणे आदर्श नवदुर्गा उत्सव मंडळांची निवड करून पारितोषिक वितरीत करण्यात आले.1) प्रथम पारितोषिक कंवर नगर दुगदिवी उत्सव मंडळ सिंधी कॅम्प, यवतमाळ, 25,000 रु. (पंचवीस हजार) रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, 2) द्वितीय पारितोषिक सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ, उमरखेड 21,000 रु. (एकवीस हजार) रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र 3) तृतीय पारितोषिक शिवशक्ती दुर्गाउत्सव मंडळ विठठलवाडी 15,000 रु. (पंधरा हजार) रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, देउन गौरविण्यात आले. 1) हरिविष्णु दुर्गाउत्सव मंडळ, पांढरकवडा, 2) शिवराय दुर्गाउत्सव मंडळ यवतमाळ या दोन मंडळांना प्रोत्साहनपर पारितोषिक प्रत्येकी
तसेच आदर्श दुर्गा उत्सव मंडळ स्पर्धे करीता मोलाचे कार्य पार पाडणारी निवड समिती सदस्य 1. डॉ. प्रशांत गावंडे, 2. प्रा. घनशाम दरणे, 3. प्रा.सौ. माणिक मेहरे 4. श्री नितीन पखाले 5. प्रा. सुवर्णा ठाकरे 6. श्री अनंत कौल्गीकर 7. श्री. संजय सांबजवर 8. श्री. अमोल ढोणे 9. श्री. विनोद दोन्दल 10. प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे 11. रवी ठाकुर 12) कोशव बने यांनी पार पाडले.”आदर्श दुर्गा उत्सव मंडळ” निवड समिती मध्ये “आदर्श नवदुर्गा उत्सव मंडळांना भेट देऊन गुण विजेत्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाची निवड करण्यात आली.
मा. जील्हाधीकारी श्री. वीकास मीना, यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.. कुमार चिंता तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात ASP पुसद श्री. बी. जे. हर्षवर्धन , ASP पांढरकवडा श्री. बन्सल , उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा श्री भोरे , उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ श्री. वैसाणे , उपविभागीय पोलीस अधिकारी वणी थी.दळवी , उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड, श्री. गायकवाड यांचे हस्ते गौरवीण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री. कुमार चिंता यांचे मार्गदर्शनामध्ये श्री. प्रशांत कावरे पोलीस नीरीक्षक, कल्याण शाखा, यवतमाळ व त्यांची टिम यांनी केले असुन, कार्यक्रमाकरीता जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व पोलीन अंमलदार तसेच गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सपोनि शुभांगी गुल्हाने यांनी केले, कार्यक्रमाची प्रस्तावना अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात यांनी केली. व सदर सत्कार समारंभाचे आभार प्रदर्शन SDPO श्री. दिनेश वैसाणे यांनी केले.
वणी : वणी शहरात कर्कश आवाज करत बुलेट चालवणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक नियंत्रण शाखा वणी मार्फत कार्यवाही करण्यात आली .बुलेटचे कर्कश आवाज करणारे सायलेन्सर काढून जप्त करण्यात आले.
मूळ कंपनीचे सायलेन्सर लावल्यानंतरच त्यांचेवर मोटर वाहन कायद्या अंतर्गत कार्यवाही करून दंडाची रक्कम भरून घेऊन सदर बुलेट वाहने सोडण्यात आली. बुलेट वापरणाऱ्या वाहन चालकांनी मूळ कंपनीचे सायलेन्सर बुलेट ला वापरावे व कायद्याचे पालन करावे असे वाहतूक नियंत्रण शाखा वणी तर्फे आवाहन करण्यात येत आहे.
वणी : यवतमाळ शहरात जुने भांडण पुन्हा रंगले आणि एका तरुणाची जखमी अवस्था झाली. 14 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी सुमारे 6.30 वाजता दरम्यान कुंभारपुरा येथील कब्रस्थानासमोर घडली.
सविस्तर वृत्त शेख सज्जाद शेख अकबर(वय 28) याला, जावेद शाह यासीन शाह (वय 40 रा. कुंभारपूर कळंब चौक यवतमाळ) आणि गड्डु तात्या उर्फ मोहम्मद अहेफाज मोहम्मद जावेद (वय 25) यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केली. आरोपींनी हातातील लोखंडी पाईप आणि चाकू वापरून शेख सज्जादच्या पोट, पाय, छाती आणि मांडीवर जबर मारहाण केली, ज्यामुळे त्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून शेख अकबर शेख रोशन (वय 70 रा. कुंभारपुर कळंब चौक यवतमाळ) यांच्या फर्यादीच्या जवानी रिपोर्ट वरून 894/25 अंतर्गत कलम 109, 3(5) गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.