*राज्याच्या उपमुख्यमंत्र्यानी शेतकऱ्यांप्रती केलेल्या अपमानकारक वक्तव्याचा संयुक्त किसान मोर्चाने वणीत केला जोरदार निषेध*

वणी: नागपुरच्या शेतकरी महाएल्गार आंदोलनाच्या रेट्यामुळे महाराष्ट्र सरकारने दि. 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली.परंतु दुसऱ्या दिवशी लगेच उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांनी शेतकऱ्यांविषयी “फुकट मागायची सवय बंद करावी, आम्ही अनेक वेळा कर्जमाफी दिली आहे, किती वेळा कर्ज माफ करणार आहोत, स्वतः कर्ज भरायची सवय लावावी” असे उद्गार काढले.

हे वक्तव्य शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणारे असून अत्यंत अन्यायकारक आहे.शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा आपल्या सरकारने 20% कमी भाव देऊन मागील पंधरा वर्षांत शेतकऱ्यांचे सुमारे 45 लाख कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण संस्थांच्या अहवालात नमूद आहे. याचा अर्थ, शेतकऱ्यांचे 45 लाख कोटी रुपये आपल्या सरकारकडे बाकी आहेत. तरीसुद्धा शेतकऱ्यांना “भीक मागणारे” म्हणून अपमानित करणे हे बेकायदेशीर व नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्य किसान सभा,शेतकरी संघटना व संभाजी ब्रिगेडने संयुक्तरित्या वणी येथील शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने आंदोलन करून उपविभागीय अधिकारी व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन उपमुख्यमंत्र्यावर कारवाई करण्याची याप्रसंगी शेतकरी नेत्यांनी मागणी केली.

या आंदोलनात महाराष्ट्र राज्य किसान सभेचे कॉ.अनिल घाटे,संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे,शेतकरी संघटनेचे देवराव धांडे, दशरत बोबडे यांचे नेत्रुत्वात गजानन ठाकरे, पंढरी मोहितकर, प्रेमनाथ मंगम,भाकपचे राजुर चिखलगाव जि.प.गटाचे उमेदवार कॉ. मुसाफिर देवनारायण राम, अथर्व निवडिंग यांचेसह शेकडो शेतकरी सहभागी होते.

शिव सेनेकडून वणीत जनतेच्या समस्येवर “जनता दरबार व भव्य पक्षप्रवेश सोहळा “

वणी : मागील चार वर्षापासून वणीतील जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपरिषद येथे प्रशासकीय कारभार सुरू असल्याने येथील अधिकारी जनतेच्या समस्यावर दुर्लक्ष करून आपला तोरा दाखवीत जनता यांच्यापुढे हतबल झालेली आहे 

 जनतेच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार आणि भव्य पक्षप्रवेश सोहळ्याच्या आयोजन 6 नोव्हेंबर वनी येथे दुपारी 12 ते 2 जनता दरबार व 3 ते 5 भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते विजय चोरडिया यांनी दिली.

 

शिवसेना नेते विजय चोरडिया यांनीचोरडिया सामान्य जनतेला न्याय मिळवून देणे व जनतेच्या समस्या संबंधित विभागाकडून तात्काळ सोडविणेचा हेतुने शिवसेना जनसंपर्क कार्यालय वनी विधानसभा ( घर संसार सेल जवळ जैन मंदिर समोर) संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

 संपर्कासाठी:  राजू रिंगोले (928488165 5)विकी बोलचेटवार (9922165885)

 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

शुल्लक कारनावरून सावर्ला येथे दुकानदारास मारहाण

वणी : तालुक्यातील सावरला येथे शुलक  कारणावरून वाद करून एकास विटीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.माही पान व किरणा दुकानात कुणाल प्रवीण कुलझरकर वय 18 रा. सावर्ला हे रात्री 7:30 वाजताचा आपल्या दुकानात असता आरोपी श्रीराम चिव्हाणे वय 55 सावर्ला हे दारूचा नशेत असून कुणालचा पानठेल्यावर खर्रा घेण्याकरीता आले व आपसात वाद करून कुणालने त्याना हटकेले असता आरोपी 1) विशाल श्रीराम चिव्हाणे वय 21 वर्ष व 2) श्रीराम चिव्हाणे वय 55 वर्ष रा. दोन्ही सावर्ला ता. वणी यांनी संगनमत करून कुणालला शीविगाळ करून हातातील वीट कुणालचा डोक्यात मारून जखमी केले व जिवाने मारण्याची धमकी दिली अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून रात्री 10:31 वा. अप. क्र. 690/25 कलम118(1),352,351(2),351(3)भान्यास. सदरचा गुन्हा नोंद करून पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

वसंतराव आसुटकर यांची काँग्रेस तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

वणी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुका काँग्रेस पक्षातील अध्यक्षपदात कमालीचे परिवर्तन करून नवे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते वसंतराव आसुटकर यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

काही दिवसापूर्वी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीसमोर ब्लॉक अध्यक्ष पदाच्या मुलाखती पार पडल्या यात एकमेव वसंतराव आसुटकर यांनी मुलाखत दिली होती. आसुटकर यांनी स्वाभिमानाने काँग्रेस पक्षात कार्य करून निष्ठावान व ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून तालुक्यात आपली ओळख अधोरेखित केली.

तूर्तास ते मारेगाव बाजार समितीचे संचालक, मार्डी वि. का. सह. संस्थेचे अध्यक्ष व मारेगाव इंदिरा स्मृती मंडळाचे अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहे. पक्षाने आता मारेगाव तालुका अध्यक्ष पदाची माळ आसुटकर यांच्या गळ्यात अर्पण केल्याने आगामी काळातील निवडणुका आणि पक्ष बळकटीचे तगडे आव्हान त्यांच्यासमोर आहे. येत्या पंधरवाड्यात तालुका कार्यकारिणीची निवड होणार आहे. दरम्यान, वसंतराव आसुटकर यांच्या अध्यक्ष पदाच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी श्रद्धा देशमुख, गौरी पिदुरकर व जान्हवी ठाकरे या खेळाडूंची जिल्हा संघात निवड

वणी : भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ३६ वी सब ज्युनियर महिला राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी वणी येथील तिन खेळाडूंची जिल्हा कबड्डी संघात निवड झाली आहे.अम्युचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भशी संलग्न असलेल्या भंडारा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी क्रीडा क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाची चमक दाखविणाऱ्या वणी शहरातील कु. श्रद्धा देशमुख, कु. गौरी पिदुरकर व कु. जान्हवी ठाकरे ता तिनही खेळाडूंची निवड झाली आहे. श्री नृसिंह स्पोर्टींग क्लब वणीचे हे तिन्ही खेळाडू आहेत. या खेळाडूंना येथे योग्य प्रशिक्षण व प्रशिक्षक कुणाल विशाल ठोंबरे यांचं उत्तम मार्गदर्शन लाभलं आहे. मैदानी खेळात या खेळाडूंनी घेतलेले परिश्रम आणि त्यांच्यातील जिद्द व चिकाटीमुळे ते आज उत्कृष्ट खेळाडू म्हणून समोर आले आहेत.

मैदानी खेळात आपल्या खेळाचं उत्तम प्रदर्शन करणाऱ्या या तिनही खेळाडूंची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी झालेली निवड शहरातील क्रीडा क्षेत्रासाठी गौरवाची बाब असून शहराचाही अभिमान वाढविणारी आहे.शहरातील या तिन खेळाडूंची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांचं कौतुकही होत आहे.

जन्नत हॉटेल समोर भीषण अपघात”

वणी : ब्राह्मणी फाटा जन्नत हॉटेल समोर आज सकाळी आज 1o.30 वाजताचा सुमारास एका ट्रकने स्कोडा कारला जबरदस्त धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की अक्षरशः कारचा छंदामेंदा झाला कारमध्ये 5 व्यक्ती असलेले गंभीर स्वरूपात जखमी झाले असून सर्व जखमींना वनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.असून डॉक्टरांनी4 जणांना मृत घोषित केले असून एका छोट्या मुलीला चंद्रपूर रेफर करण्यात आले.

सविस्तर रियाज त्यांच्या तीन मुली व भावाची छोटी मुलगी असे पाच जण गाडीत असून रियाज मुलीला गाडी शिकवत असल्याचे कळले असून अचानक गाडीचा तोल जाऊन गाडी डिवाइडरच्या उजव्या साईडला जाऊन समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली धडक एवढी गंभीर होती की कारचा संपूर्ण चुराडा झाला यातील रियाज व त्याच्या तीन मुली यांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता मृत घोषित केले व लहान भावाची मुलगी वय 5 वर्ष असून चंद्रपूर रेफर करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असल्याचे कळले.पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास वणीतील हजारो शेतकरी जेलभरो आंदोलन करणार

वणी :  शेतकरी शेतमजूर आणि कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये विविध शेतकरी संघटना सहभागी होऊन नागपूरच्या रस्त्यावरती शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला वणी तालुक्यातील समस्त शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांचा पाठिंबा जाहीर करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत थेट मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.       महाराष्ट्रामध्ये सध्या सत्तेत असलेल्या सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची मते घेतली मात्र सत्तेत येऊनही अजून पर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे सौजन्य फडणवीस सरकारने दाखवलेले नाही. त्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला आहे. फडणवीस सरकारने शब्द पाळला नाही. त्यामुळे आज शेतकऱ्यांना या कडाक्याच्या थंडीच्या दिवसांमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे हि दुर्दैवी बाब आहे,असेही निवेदनात म्हटले आहे.  महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टीमुळे पूर्णतः उध्वस्त झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याऐवजी फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम तुटपुंजी मदत देऊन केलेले आहे. शेतकऱ्यांनी लागवडीकरिता लावलेला खर्च सुद्धा निघणार नाही,अशी मदत देऊन शेतकऱ्यांचा घोर अपमान केला आहे.    शेतकऱ्यांचं सोयाबीन घरी आलेलं आहे, कापूस ही घरी येत आहे मात्र अजून पर्यंत सरकारी खरेदी केंद्र सुरू झाले नाही, त्याच सोबत शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाबद्दल अजूनही निश्चित घोषणा नाही. शेतकऱ्यांना शेतमाल तोट्यामध्ये विकावा लागतो हि सारी परिस्थिती या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सरकारने शेतकऱ्यावर आणून ठेवलेली आहे. या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी धुळीस मिटवलेले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा याप्रमाणे भाव देण्यासाठी महाराष्ट्राचा आणि देशाचं सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे, त्याचा परिणामस्वरूप शेतकऱ्यांच्या आत्महत्या दर दिवसाला वाढते आहे. या वाढत्या आत्महत्येला या देशाचा आणि महाराष्ट्राचा सरकार जबाबदार आहे, त्यामुळे सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही एक नैतिक अधिकार नाही. सातबारा कोरा आणि शेतमालाला भाव द्या अन्यथा खुर्च्या खाली करा असा गर्भित इशारा आंदोलनकर्त्यांनी निवेदनातून दिला आहे.      शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या,हमी भावाचा कायदा करा, शेतकऱ्यांचे संपूर्ण सरसकट कर्ज माफ करा, शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या, खरीप हंगामा करिता विनाअट कर्ज उपलब्ध करून द्या,  या प्रमुख मागण्या व इतरही मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे.     नागपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन आंदोलनातील संपूर्ण मागण्या मान्य कराव्या अन्यथा नेतृत्वाने आव्हान केल्याप्रमाणे सबंध महाराष्ट्रामध्ये जेलभरो आंदोलन केल्या जातील आणि त्यात वणी तालुक्यातील हजारो शेतकरी मोठ्या संख्येने जेल भरो आंदोलन करतील,याकडे सरकार म्हणून दुर्लक्ष करू नये. असेही निवेदनातून सरकारला कळविले आहे.     निवेदन देताना  मधुकर लांडे, किसान सभेचे कॉ.मनोज काळे, कॉ. ॲड. दिलीप परचाके, कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, अजय धोबे, लक्ष्मण देठे, गजानन राजुरकर, कुंदन टोंगे, गीत घोष, पुंडलिक पिंपळशेंडे, संजय गोहोकर, किसन राजुरकर, सतीश भटगरे, सेनापती पावडे, , त्याच प्रमाणे वणी वकील संघाने ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून वणी वकील संघाचे अध्यक्ष ॲड.विरेंद्र महाजन, सचिव ॲड. अमोल टांगे, ॲड. शेखर वऱ्हाटे, ॲड.  विप्लव तेलतुंबडे, ॲड.  अमन शेख आदी उपस्थित होते.

मारेगावात संविधान जनजागृती यात्रा-

वणी : मारेगाव भारत जोडो अभियान अंतर्गत विविध सामाजिक संघटने मार्फत आयोजित संविधान न्याय जनजागृती यात्रा मारेगावात बुधवार ला दाखल होताच उत्स्फूर्त स्वागत करुन देशाची एकात्मता व अखंडता टिकविण्यासाठी उपस्थितांनी यथोचित मार्गदर्शन केले.

अलीकडेच संविधान विरोधी वातावरण तयार होवून संविधानातील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी होतांनाचे चित्र आहे. जाती धर्मात तेढ निर्माण करत देश अराजकतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आपले हक्क, संरक्षण व एकात्मता टीकविण्यासाठीच्या या प्रमुख उद्देशाने ही यात्रा न्यायिक जनजागृती करीत आहे.

परिणामी, संविधान जागर या ऐतिहासिक रथात मला सहभागी होण्याचे भाग्य अधोरेखित करतांना भारताचे संविधान संपूर्ण देशासाठी दिशादर्शक व भारताला सशक्त करणारी असेल असा आशावाद यावेळी मारेगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारोती गौरकार यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान न्याय जनजागृती यात्रेत विविध मुद्याचा परामर्श घेण्यात आला.याप्रसंगी वसंत जिनिंगचे संचालक अंकुश माफूर, सरपंच तुळशीराम कुमरे, जेष्ठ पत्रकार दीपक डोहणे,पत्रकार उमर शरीफ, राजु घुमे, पत्रकार भैय्याजी किनाके, मुख्य निमंत्रक उत्तमराव खंदारे, गोविंद चव्हाण, सविताताई हजारे, प्रा. दीपक वाघ, विठ्ठलराव नागतोडे यांचेसह बहुतांश नागरिकांची उपस्थिती होती.

नियमित वाचनाने व्यक्तीची स्वतंत्र ओळख निर्माण होते-पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर

वणी : वाचनाने मन व मस्तिष्क सुदृढ होते. त्यामुळे काय वाईट काय चांगले याचा निर्णय घेता येतो. जे जीवनामध्ये खूप आवश्यक आहे. अशा प्रकारे नियमित वाचनाने व्यक्तीची स्वतंत्र ओळख निर्माण होते. असे प्रतिपादन येथील ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी केले.

ते नगर वाचनालयात आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका संघचालक हरिहर भागवत हे होते. दरवर्षी नगर वाचनालयात महाराष्ट्रातील दर्जेदार साहित्यिक, विनोदी, स्त्री शक्ती विषयक विविध दिवाळी अंकांची खरेदी करून वाचकांना उपलब्ध करून देण्याच्या आधी वणीकरणा या दिवाळी अंकांचे अवलोकन करता यावे यासाठी दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

या प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर अतिथीसह उपस्थितांनी या अंकांचे अवलोकन करून आनंद व्यक्त केला.दोन दिवसाच्या प्रदर्शनानंतर दिनांक 26 ऑक्टोबर पासून 300 रुपये ना परतावा नोंदणी शुल्क देऊन 35 दिवाळी अंक वाचता येणार आहे. अध्यक्षीय भाषणात भागवत यांनी नगर वाचनालय वाचन संस्कृती वाढविण्यासाठी करीत असलेल्या उपक्रमाचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष विशाल झाडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार यांनी मेहनत घेतली.

दिग्रस पोलिसांचा चालू हातभट्टी दारूवर छापा”

वणी: आज रोजी 9:25 वा. गुप्त माहितीच्या आधारे मांडवा येथील हातभट्टी दारूवर दिग्रस पोलिसांनी छापा टाकून दोन वेगळ्या ठिकाणावरून 160 लिटर मोह फुलाचा सोडवा रसायन दारू साठा की. 2800 रुपयाचा नष्ट केला.

सविस्तर वृत्त आरोपी नामे 1) दिलीप श्रीचंद्र रत्ने वय 40 रा. मांडवा यांच्या घरी रेड केला असता 60 लिटर हातभट्टीची दारूअंदाजे कि. 6000 रू.जप्त करून सॅम्पल घेऊन जागेवर ई साक्ष पंचनामा करून नष्ट करण्यात आली तसेच आरोपी नामे 2) आकाश भिमराव भानावत वय 35 रा. मांडवा यांच्या घरासमोरील टीनाच्या शेडमध्ये चालू हातभट्टीवर रेड करून 100 लिटर हातभट्टी दारूअंदाजे की. 1000 रू. व मोह फुलाचा सडवा रसायन 200 लिटर अंदाजे की. 1200 रू. असे एकूण 2200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ई साक्ष पंचनामा केला व पंचासमक्ष सडवा व दारू सॅम्पल घेऊन जागेवर नष्ट करण्यात आली. दोन्ही आरोपी विरुद्ध कलम 65 (ख, ड, फ,) मुंबई दारूबंदी कायद्याप्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पो. नि. वैजनाथ मुंडे, पो. उपनि. महेश देशमुख,पो. कॉ. आदित्य जाधव, महिला पोलीस अमलदार मोनालिसा यांनी केली असून पुढील तपास दिग्रस पोलीस करीत आहे.