सेवानिवृत्त शिक्षकाचा अपघातात मृत्यू

मारेगाव : वणी–मारेगाव रोडवरील राष्ट्रीयकृत बँकेसमोर झालेल्या दुचाकी अपघातात सेवानिवृत्त शिक्षक मुकुंदराव पत्रुजी राजूरकर (वय 61) यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) दुपारी दोनच्या सुमारास राजूरकर हे बँकेतून घरी जात असताना मागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. वणी येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या दुखत निधनाने हळहळ व्यक्त आहे. राजूरकर हे दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेतून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.

अवधूतवाडी पोलीससांची कारवाई 3,74,931 रू.मोबाईल शोधले

वणी : यवतमाळ शहर अवधूतवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत मोबाईल चोरीचा गुन्ह्यातील तक्रारी वरून अवधूतवाडी पोलीसांनि CERI पोर्टलचा आधारे तपास करून 27 मोबाईल कीं. अ. 3,74,931 रूपयाचे शोधून सदर मोबाईल सर्व मूळ मालकांना परत करण्यात आले सर्वाना मोबाईल परत मिळाल्याने आनंद व्यक्त केला व अवधूतवाडी पोलीसांचे आभार मानले

शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे निवेदन

वणी: कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या तातडीच्या प्रश्नांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे सोमवारी काँग्रेसतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सीसीआय कापूस खरेदी नोंदणीसाठी तात्काळ मुदतवाढ द्यावी, मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, तसेच नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी नोंदणी प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. हे निवेदन काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात देण्यात आले.दुपारी सुमारे 12 वाजता काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी तहसिल कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली आणि नंतर अधिकृतरित्या निवेदन सादर केले.

आपल्या भागात कापूस आणि सोयाबीन हे शेतकऱ्यांचे मुख्य पिक आहे. पण शासनाच्या धीम्या गतीमुळे आणि ऑनलाइन प्रक्रियेमुळे अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहतात. शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत तात्काळ निर्णय घेतला पाहिजे; अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल,”— संजय खाडे, प्रदेश सचिव, काँग्रेस पार्टी

हंगाम 2025-26 मधील कापूस खरेदी केंद्र शासनाच्या आधारभूत दरानुसार सीसीआयमार्फत कार्यरत राहणार आहे. मात्र सध्या खरेदी नोंदणीची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2025 निश्चित आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल किंवा इंटरनेटची सोय नसल्याने ऑनलाइन नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. तसेच मार्डी परिसरात सीसीआय खरेदी केंद्र सुरु नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तसेच, नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीची नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरु नसल्याने शेतकऱ्यांना बाजारात अत्यल्प दराने सोयाबीन विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने नोंदणी प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी पुरुषोत्तम आवारी, अशोक चिकटे, राजू अंकतवार, प्रफुल्ल उपरे, प्रमोद वासेकर, प्रमोद लोणारे, सुधीर खंडाळकर, कैलास पचारे, पलाश बोंडे, महादेव पडोळे, एस. पेंदोर, विप्लव तेलतुंबडे, प्रेमनाथ मंगाम, अनंता डंभारे, नरेंद्र चिकटे, दिनेश पाहुनकर, सुनील वरारकर, प्रशांत गोहोकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रहारचे आवाहन, नागपूर येथे शेतकऱ्यांचे आंदोलन

वणी : शेतकऱ्यांचे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. शेतकरी नेता शरद जोशी यांच्या अंगारमळ्याची माती कपाळाला लावून प्रहार जनशक्ती पक्षाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढ्याचा बिगुल वाजवला आहे. “शेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण” या घोषणेसह येत्या 28 ऑक्टोबर 2025 रोजी नागपूर येथे महा एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख, माजी आमदार बच्चुभाऊ कडू करणार आहेत.या मोर्च्यात जाहीरनाम्यातील वचनांची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे ठोस भूमिका मांडण्यात येणार आहे.

त्यातील प्रमुख मागण्या म्हणजे — राज्यात तात्काळ ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, तसेच शेतीमालाला एम.एस.पी.सह 20 टक्के बोनस देण्यात यावा, याशिवाय इतर अनेक मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी जनशक्ती पक्षाची ठाम भूमिका आहे.या पार्श्वभूमीवर यवतमाळ उपजिल्हा प्रमुख मोबीन शेख यांनी वणी, झरी व मारेगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की, जाती-धर्म, पंथ-पक्ष यापलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एकत्र यावे. “28 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या या महा एल्गार मोर्चात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या आवाजाला बळ द्या,” असे भावनिक आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.या शासकीय विश्राम गृहात पार पडलेल्या परिषदेला शेतकरी संघटनेचे देवराव भाऊ धांडे, सतीश देरकर, प्रहारचे शहराध्यक्ष सय्यद अहेमद, जनार्दन टेकाम सह सचिव यांच्यासह प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

“अनैतिक संबंधातून क्रूर हत्या”

वणी : शहरात घडलेल्या हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या असून दि. 23ऑक्टोबर 025रोजी गजानन नगरी वडगाव रोड वनी येथे धारदार शस्त्र व दगडाने मारहाण करून डोक्याला गंभीर दुखापत व रक्ताने माखलेला एक मृतदेह आढळून आला.

तो स्वप्निल किशोर राऊत वय 26 रंगनाथ नगर वनी अशी ओळख पटली 23 ऑक्टोबर 025 ला ठेकेदाराकडून पैसे आणायचे असे सांगून तो घराबाहेर पडला संध्याकाळी 6 वाजता पत्नीने फोन केला असता तो लवकर घरी येतो असे सांगितले परंतु रात्र होईपर्यंत घरी परतला नाही 24 ऑक्टोबर 025 च्या सकाळ पासून नातेवाईकांनी शोध सुरू केला असता मित्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गजानन नगरी वडगाव रोड वणी येथ मिळालेला मृतदेह स्वप्निलचा असल्याचे कळले मोठा भाऊ चेतन किशोर राऊत वय 28 रंगनाथ नगर वणी यांच्या फिर्यादीवरून तात्काळ गु.र.नं. 682/2025,कलम 103 (1) भा.न्या.स. नुसार गुन्हा नोंद झाला.

उपविभागीय पोलीस अधिकारी वणी श्री दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वणी गोपाल उंबरकर, तसेच स्थानिक गुन्हे शाखा वणी यांनी तांत्रिक बाबीच्या आधारे तपस चक्री फिरवून या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी 1) सुमेश रमेश टेकाम वय 24 रा. वडजापुर ता. वणी 2) सौरभ मारुती आत्राम वय 27 रा. वडजापूर ता. वणी यांना सीताफिने अटक केली असून अनैतिक संबंधातून स्वप्निल ची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपास पो.उपनि. सुदाम असोरे पोलीस स्टेशन वणी करीत आहे.

“सायकल बँक” उपक्रमात सहभागी व्हा. वापरात नसलेली सायकल स्माईल फाउंडेशनला दान करा!

वणी : गरजू आणि अभ्यासू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने स्माईल फाउंडेशन तर्फे “सायकल बँक” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वापरात नसलेल्या, चांगल्या स्थितीत असलेल्या सायकली फाउंडेशनला दान स्वरूपात स्वीकारल्या जातात. त्या सायकली दुरुस्त करून गरजू विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येतात.या उपक्रमाची सुरुवात इंजिनिअरिंग विद्यार्थी मोहित हांडे यांनी स्वतःची सायकल स्माईल फाउंडेशनला डोनेट करून केली. ही सायकल अशा विद्यार्थ्याला देण्यात येणार आहे.ज्याला आई-वडील दोघेही नाहीत, जो अभ्यासात हुशार असून शिक्षणाच्या प्रवाहात आहे आणि सायकलची खरी गरज आहे.फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव, उपाध्यक्ष पियुष आत्राम, सचिव आदर्श दाढे, तसेच विश्‍वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, कुणाल आत्राम, रोहन कोरपेनवार, सचिन जाधव, तन्मय कापसे, अनिकेत वासरीकर, कार्तिक पिदुरकर, जगदीश गिरी, शुभम भेले, भूषण पारवे, सिद्धार्थ साठे आदी सदस्य या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.स्माईल फाउंडेशन ही संस्था वर्षभर पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. नागरिकांनी आपल्या वापरात नसलेल्या सायकली दान करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.फाउंडेशनची टीम नागरिकांच्या ठिकाणी जाऊन सायकल गोळा करण्याची सुविधा देत असून, इच्छुकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

संपर्क : 7038204209 स्माईल फाउंडेशनची टीम सायकल आपल्या ठिकाणाहून गोळा करेल.

चोरट्याची दिवाळी “2,94,283 रुपयांवर डल्ला “

वणी : दिवाळीच्या सणाचा पर्वावर ज़िल्हा पोलीस दलातर्फे आव्हान करण्यात आले असून आपल्या घराचा सुरक्षेचा दृष्टीने बाहेर गावी जाताना जवळील पोलीस स्टेशनला माहिती दया, घरात रात्रीला लाईट सुरु ठेवा जनेकरून कोणी घरी असल्याचा भास होईल अशा अनेक सुरक्षेचा करणावरून सतर्क राहण्याचा आव्हान केले आहे.

यवतमाळ येथिल मनीष ज्ञानेश्वर गुलवाडे वय 53 रा.चांदोरे नगर आपल्या परिवारासह दिवाळी निमित्त बाहेरगावी गेले असता 22ऑक्टोबर चा राती अज्ञात चोरट्याने त्याच्या घराचे दरवाचे कुलप कोंडा तोडून आत प्रवेश करून बेडरूममधले प्लायवुडचा आलमारीत ठेवलेले सोन्याचे तुकडे एकूण वजन 39.090 ग्रॅम कि. 2,94,283 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला अश्या जबानी रिपोर्टवरून अप. क्र. 906/25 कलम 331(4)305(अ ) भान्यास. सदरचा गुन्हा नोंद करून पुढील तपास यवतमाळ शहर पोलीस करीत आहे.

वणी नगरपरिषद निवडणुक शिवसेना स्वबळावर लढण्यास सज्ज

सणासुदीला शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

वणी : ऐन दिवाळीच्या सणाला एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कुरई येथील शेतकरी शंकर गणपत चटप (36) यांनी दिनांक २० ऑक्टोबर रोजी रात्री ९:३० चे दरम्यान आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले.या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयानी उपचारा करीता रुग्णालयात चंद्रपूर येथे भर्ती केले. दरम्यान दुसऱ्या दिवशी २१ ऑक्टोंबर ला रात्री २१ वाजताचे सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला अशी माहीती मिळाली. मृतकाचे पच्शात पत्नी शितल शंकर चटप(30), मुलगा अभिनंदन शंकर चरय (5),मुलगी हिमांशी शंकर चटप(3),असा आप्त परिवार आहे.मृतकाचे कुटुंबात पत्नी शितल शंकर चटप यांचे नावे मौजा गोवारी (पा) येथे गट क्र 58/1 क्षेत्र 1.29 हे.आर. सामाईक जमीन आहे. शंकर चटप यांनी ऐन दिवाळीच्या सणाला विषारी औषध प्राशन करून आपले जिवन का संपविले? याची माहिती मिळू शकली नाही. पुढील तपास पोलीस करत आहे.

आंदोलनकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाल्यास भाकपचे लाल सैनिक यथोचित उत्तर देणार- काॅ.अनिल हेपट

वणी: वणी विधानसभा मतदारसंघात जेवढ्या खाजगी कोळसा व सिमेंट आणि इतर कंपण्या स्थापीत होत आहेत किंव्हा सुरु आहेत अशा सर्व कंपन्यामध्ये 80% स्थानिक भुमीपुत्रांना कामावर घ्या अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने लाऊन धरली आहे.त्याअनुषंगाने बेलोरा निलजई भागातील जिएनआर व साईडएक्स कंपनीमध्ये शेती गेलेल्या भुमीपुत्रांना नोकरीत सामाऊन घेण्याची मागणी भाकपने वारंवार केली आहे.कंपनिने स्थानिक युवकांना कामावर घेण्याचा शब्द भाकपला दिला.परंतु कंपनीने वारंवार दिलेला शब्द फिरविल्याने वणी विधानसभा मतदारसंघाचे एकमेव लढाऊ लाेकनेते काॅ.अनिल हेपट यांचे नेत्रुत्वात भुमीपुत्रांनी ऐन दिवाळीत बेमुदत आंदोलन सुरु केले. कंपनीकडून आंदोलनकर्त्यांना धमक्या सुद्धा देण्याचा प्रयत्न सुरु आहे.प्रशासन मौन आहे.आंदोलकाना कसल्याही प्रकारचा धोका निर्माण झा ल्यास भाकपचे लाल सैनिक भाकप स्टाईलने उत्तर देण्यास सक्षम असल्याचा ईशारा काॅ.अनिल हेपट यांनी दिला आहे.स्थानिक युवकांच्या रोजगार हक्कासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा गेल्या चार दिवसापासून संघर्ष सुरूच…निलजई, ता. वणी, जि. यवतमाळ — वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) निलजई प्रकल्पात स्थानिक युवकांना रोजगारापासून वंचित ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वणी तालुका तर्फे १६ ऑक्टोबर २०२५ रोजी ठिया आंदोलन व १७ ऑक्टोबर रोजी रस्ता रोको आंदोलन आणि १८, १९ ऑक्टोंबर रोजी काम बंद आंदोलन करण्यात आले. कंपनी ज्या भूमीतून कोळसा काढते, त्या भूमीतील युवकांना रोजगार न देणे हा उघड अन्याय असून, भूमिहीन शेतमजूर व स्थानिक युवकांना दुर्लक्षित केल्यामुळे हा संघर्ष उभारण्यात आला.तसेही 80% स्थानिक युवकांना कंपनिने रोजगार द्यावा असा दि.18 नोव्हें.2008 चा शासनादेश आहे.आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड अनिल हेपट, कॉम्रेड अनिल घाटे, कॉम्रेड मोरेश्वर कुंटलवार, कॉम्रेड अथर्व निवडींग यांनी केले. “स्थानिकांना रोजगार द्या — बाहेरच्यांचा हस्तक्षेप थांबवा!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. पोलिस प्रशासनाने दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मात्र कॉम्रेड अनिल हेपट यांनी ठाम शब्दांत सांगितले — “मागण्या मान्य करा, अन्यथा आमच्यावर गुन्हे दाखल करा; पण लढा थांबवणार नाही.”दरम्यान, साईडएक्स कंपनीने आंदोलन दडपण्यासाठी गुंडांना पुढे करून आंदोलनकर्त्यांना धमकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. “तुम्हाला पाहून घेईन” अशा भाषेत धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी प्रशासन मात्र मौन बाळगून बसले आहे. या कंपनीच्या गुंडा मुळे परिसरात शांतता व सुवेवस्थाचा प्रश्न निर्माण होत आहे. दिवाळीसारख्या सणाच्या काळात महिला आणि लहान मुलांसह नागरिक चार दिवसांपासून रस्त्यावर बसून आंदोलन करत असताना साईडएक्स कंपनी, माईन्स व पोलिस विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने संताप उसळला आहे.आंदोलनकर्त्यांनी साईडएक्स कंपनीला WCL कडून दिलेले माती काढण्याचे ठेके बेकायदेशीर असल्याचा आरोप करून या कंपन्यांना परिसरातून हाकलून लावण्याची मागणी केली आहे. कोलमाईन्स प्रशासन आणि शासन यांच्या मिलीभगतीमुळेच हा अन्याय सुरू असल्याचे स्पष्ट करत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने चेतावणी दिली आहे की स्थानिकांना रोजगार मिळेपर्यंत आणि बेकायदेशीर कंपन्यांवर कारवाई होईपर्यंत हा संघर्ष अखंड सुरू राहील अशी भाकपने घोषणा केली.