न्यायव्यवस्थेवरील हल्ला म्हणजे संविधानावर हल्ला
आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची निवेदनातून मागणी
टोलेबाज वार्ता पत्र : रवि घुमे :मारेगाव
देशाचे सरन्यायाधीश मा. न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान झालेल्या घृणास्पद हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडी, तालुका मारेगावच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
या हल्ल्याला भारतीय संविधानावर आणि न्यायदानाच्या प्रक्रियेवर केलेला थेट हल्ला मानून, वंचित बहुजन आघाडीने आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदणाद्वारे केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांच्या नेतृत्वात मारेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मोठ्या संख्येने कार्यकर्ते तहसील कार्यालयावर धडकले. बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर, कार्यकर्त्यांच्या समूहाचे मोर्चात रूपांतर झाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठावर खुद्द सरन्यायाधीशांच्या दिशेने जोडा फेकण्याचा प्रयत्न हा केवळ एका व्यक्तीवर केलेला हल्ला नाही, तर तो भारतीय लोकशाही संस्थांचा आणि मूल्यांचा अनादर आहे.
वंचित बहुजन आघाडीने भारत सरकारकडे मागणी केली की, या घटनेतील आरोपी वकील राकेश किशोर याच्यावर केवळ निलंबनाची कारवाई न करता, कठोर कायदेशीर कार्यवाही लवकरात लवकर करावी.
न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि भविष्यात अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी, आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.
न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळू शकतो. त्यामुळे सरकारने तत्काळ लक्ष घालून, न्यायव्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठी ठोस पाऊले उचलावीत असे स्पष्टपणे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तहसीलदारांना निवेदन
देण्यासाठी निघालेला मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यावर, मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांनी वंचित बहुजन आघाडीचे निवेदन स्वीकारले. यावेळी वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांनाही मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
मोर्चादरम्यान ‘भारतीय संविधान जिंदाबाद!’, ‘भारतीय लोकशाही जिंदाबाद!’, ‘भारत देश जिंदाबाद!’ परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद! अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
यावेळी ज्ञानेश्वर मुन, अनिल खैरे, अभिषा निमसटकर, यशोधरा लिहीतकर, अनंता खाडे, रवी तेलंग, रेखाताई काटकर, शोभाताई दारुंडे, विप्लव ताकसांडे, संजय जीवने, अमरनाथ तेलतुंबडे, गौतम ताकसाडे, धम्मपाल दारुंडे, वसूमित्र वनकर, विजय खाडे, प्राणशील पाटील, गंगाधर तेलंग, चिंतामण वेले, सलीम अहमद कुरेशी, अजय चंदनखेडे, बबन हस्ते, रवी वनकर, राजानंद गांजरे, रमेश चिकाटे, सुमित हस्ते, दीक्षा गजभिये, कामिनीबाई खैरे, निळावती मुन, लक्ष्मीकांत तेलंग, राजू पाटील, शेख दिलदार सेख शीकंदर, धीरज लोखंडे, धनराज मुन, विनेश मेश्राम, यशवंत भरणे, स्वाती दारुंडे, सुकेसनी लिहितकर, गौतम मालखेडे, अजबराव गजभिये, ईश्वर वानखेडे, दीपा तेलंग, ज्ञानेश्वर धोपटे, गौतम दारुडे, राहुल नंदुरकर, किरण लढे, कविता ताकसांडे, ताराबाई मेश्राम, पुष्पा ताकसाडे, वंदना रायपुरे, दीपा तेलंग, वंदना वासेकर, तात्याजी चिकाटे, सुनील वाघमारे, प्रफुल भगत, प्रवीण नरांजे, मनोज चंदनखेडे, गौतम कवाडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची तसेच पत्रकार बंधुची उपस्थिती होती.