पांढरकवडा पोलिसांचा अवैध जुगार अड्ड्यावर छापा

पांढरकवडा : पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ता. 22 च्या सायंकाळी पाटणबोरी येथे जाकपॉट वाईनबारच्या मागे रूम मधे सुरु असलेल्या जुगारावर छापा मारत 5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
प्राप्त माहिती अशी की,राष्ट्रीय महामार्ग 44 वर पाटणबोरी गावानाजिक असलेल्या जॅकपॉट वाईन बारच्या मागे असलेल्या बंद खोलीत जुगार खेळत असलेल्या 20 जुगारांना व विनापरवाना अवैध चालवत असलेल्या अड्डा मालक शेख आसिफ शेख चांद याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार कारवाई केली.

अटकेत असलेले शेख आसिफ शेख चांद पारवा, शेख नासिर शेख मदार आदिलाबाद तेलंगणा,शेख रउफ शेख उस्मान आर्णी,शेख रहमान शेख अब्दुल घाटंजी,राजू नानाजी वाघ घाटंजी,सद्दाम रज्जाक शेख घाटंजी,अंकुश केशव नागेकर तिवसाळा ता. घाटंजी,दत्ता लक्षमन कापडे कोदुरी ता. केळापूर,सतिष पिराजी अंडेवार आदिलाबाद,मालारेड्डी शेकन्ना पानोजवार पाटणबोरी, पंकज रंजनराव भोयर घुबडी ता. केळापूर, नामदेव जीवन नव्हाते घाटंजी,रुपेश भाऊराव भोयर खापरी ता. घाटंजी,राजेश शिवप्रसाद धूत भुक्तापूर आदिलाबाद,आशिष संतोष करनमावर मांडवी ता. जारीजामणी,रामकिसन माधव किनाके टेम्भी ता. केळापूर, राजेश उद्धव बोबडे घाटंजी, उदय महेश गुप्ता घाटंजी, फिरोज अयुब खान आर्णी, आकाश रामराव मोहिते पारवा.
सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता यवतमाळ, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बंसल पांढरकवडा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांचे नेतृत्वात सपोनी सागर पेंढारकर पोहेकॉ गजानन पत्रे पोहेकॉ राम राठोड, नापोकॉ किशोर आडे,पोशी विवेक ध्यावर्तीवार पोशी सूर्यकांत गीते यांनी पार पाडली. पुढील तपास सपोनी सागर पेंढारकर पो. स्टे. पांढरकवडा हे करत आहे.

बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करू नये

झरीजामणी तालुका सकल आदिवासी समाजाचे निवेदन.

झरीजामणी : बंजारा/ लंबाडा समाजाला अनुसूचित समाजात समाविष्ट करण्याची मागणी जोर धरत असतांनाच आदिवासी बांधवांकडून कडाडून विरोध होतांना दिसत आहे. यासंदर्भात झरीजामणी तालुक्यातील आदिवासी बांधवानी मा. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्र्यांना झरीजामणी तहसीलदारमार्फत निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, ‘बंजारा’ समाजाचा उगम व्यापारी व भटक्या समाजात असून त्यांनी आदिवासींच्या घटनात्मक निकषांपैकी एकही निकष पूर्ण केलेले नाहीत. १९५० च्या राष्ट्रपती आदेशात व पुढील सुधारणांमध्ये बंजारा समाज अनुसूचित जमातीच्या यादीत नाही. तसेच १९५३ च्या काकासाहेब कालेलकर आयोगाने व मुंबई राज्याच्या यादीनुसार बंजारा/लंबाडा समाज ओबीसी प्रवर्गात नोंदविला आहे.

१९७९ मध्ये महाराष्ट्र शासनाने बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. मात्र निकष पूर्ण न झाल्यामुळे तो प्रस्ताव १९८१ मध्ये मागे घेण्यात आला होता. “४४ वर्षांपूर्वी जे निकष पूर्ण झाले नाहीत, ते आता २०२५ मध्ये कसे पूर्ण होऊ शकतात, हा मोठा प्रश्न आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

१) बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करू नये.२) मा. राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आदिवासी आमदारांची बैठक घेण्यात यावी.३) जात पडताळणी कायदा २००० मध्ये सुधारणा कराव्यात.४) शासनातील ८५ हजार रिक्त पदे व आदिवासी आरक्षणातील रखडलेली १२,५०० पदे तात्काळ भरण्यात यावीत.५) अनुसूचित क्षेत्रातील १३ जिल्ह्यातील संवर्ग पदांची भरती व नियुक्त उमेदवारांना कायम करण्यात यावे.६) आश्रम शाळांमधील खाजगीकरणाचा GR रद्द करून वर्ग ३ व ४ कर्मचारी पुन्हा नेमण्यात यावेत.७) DBT पद्धतीतून विद्यार्थ्यांना होस्टेलबाहेर काढण्याची प्रथा बंद करण्यात यावी.

बालसदन जळका येथून मुलगा बेपत्ता 

              पोलीस स्टेशन मारेगाव अंतर्गत येत असलेल्या जळका येथील बालसदन येथून एक मुलगा बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर बाबीची तक्रार पोलीस स्टेशन मारेगाव येथे करण्यात आली आहे.

           रुद्रा आकाश राठोड वय ९ वर्ष रा. खडबडा मोहल्ला, रंगनाथ नगर, वणी,जिल्हा यवतमाळ (ह. मु. आनंद बाल सदन, जळका ) असून  तो दिनांक २२ सप्टेंबर  रोजी सकाळी ६. ४५ वा. बाल सदन गृह येथे हजर होता त्यानंतर कुणाला काहीच न सांगता बाल सदन मधून निघून गेला आहे.अशी तक्रार  मोहन महादेव उईके , काळजीवाहक आनंद बाल सदन जळका यांनी पोलीस स्टेशन मारेगाव येथे दिली आहे.

त्यानुसार  वर्णन – उंची ३ फूट ५  इंच, रंग सावळा असून त्याने पांढरा शर्ट -निळा फुल पॅन्ट परिधान केला असून त्याला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाचा मुलगा आढळ्यास पोलीस स्टेशन मारेगाव येथे कळविण्यात यावे असे आवाहन पोलिस निरीक्षक श्याम वानखेडे , पोलीस जमादार  किसन सुंकुलवार यांनी केले आहे 

मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा,

राज्यासह तालुक्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच कर्जमाफी झाली नाही. त्यात शेतातील पीक देखील हातातून गेले आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी काँग्रेसने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.

राज्यसह मारेगाव तालुक्यालाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून सोयाबीन, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे. तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मारेगाव तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली करण्यात आली.

शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. बळीराजा आस लावून बसला असून तालुक्यातील शेतकरी निराश झाले आहे. त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. तालुक्यातील पंचनामे लवकर पूर्ण करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद बालकल्याण सभापती अरूणाताई खंडाळकर, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा, तुळशीराम कुमरे, अंकुश महापुर, विजय घोटेकर, आकाश बदकी, यादव काळे, माया पेंदोर सह तालुक्यातील काॅग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येमध्ये या उपस्थित होते.

TWJ फ्रँचाईस बिझनेस अग्रीमेंट कंपनीने ग्राहकांची -3 कोटी 31 लाखाची फसवणूक

यवतमाळ : जांब रोड येथील TWJ फ्रँचाईस बिझनेस अग्रीमेंट कंपनीने पैसे गुंतवणीचा बदल्यात अधिक व्याज देण्याच्या प्रलोभनातून गुंतवणूकदारांची फसवणूक केली.3,% ते 4 % दराने दोन तीन महिने सुरळीत व्याज दिले. नंतर ग्राहकांनी व्याज व मुद्दल परत मागितल्यास TWJ कंपनीने उडवा उडवीचे उत्तर देत टाळाटाळ करत राहिले.

सविसर वृत असे कि गजेंद्र श्रावणजी गणवीर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे 29 लाख रुपये व तसेंच इतर ग्राहकांची एकूण 3 कोटी रुपयांणी फसवणूक केली शेवटी फिर्यादी गजेंद्र श्रावनजी गणवीर वय 55 रा अंबिका नगर यवतमाळ यांच्या फिर्यादीवरून 21सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1वाजेच्या सुमारास TWJ फ्रँचाईस बिजनेस अग्रीमेंट कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल केला.

आरोपी 1) समीर नार्वेकर वय 40वर्ष CMD TWJ असो. प्रा. लि. पुणे 2)सागर मयलवार वय 38 वर्ष शाखा व्यवस्थापक TWJ. असो. प्रा. लि. यवतमाळ 3)सुरज माडगुलवार वय 37 वर्ष लेखापाल TWJ असो. प्रा. लि. यवतमाळ यांचा विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 1306/25 कलम 316/(2),318(4),3(5) कलम 3,4 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास अवधूतवाडी पोलीस करीत आहे.

आयुष्यमान कार्डाच्या तांत्रिक अडचणीने लाभार्थी मेटाकुटीस

मारेगाव :आयुष्यमान कार्ड ही केंद्र शासनाची योजना आरोग्याशी संबंधीत असतांना धान्य मिळविण्यासाठी राशन कार्ड आहे. आयुष्यमान कार्ड आणि धान्य वितरणाचा काडीमात्र संबंध नसतांना काही तांत्रिक कारणास्तव आयुष्यमान कार्ड काढण्यास विलंब झालेल्या गरीब लाभार्थ्यांचा शासकीय अन्नधान्य पुरवठा रोखून धरण्याचा बेकायदेशीर प्रकार मारेगावात घडल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आल्याने लाभार्थी पुरता मेटाकुटीस आला आहे.याबाबतचे निवेदन प्रशासनास सादर करण्यात आले आहे.

अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या तीन मुलभूत गरजा आहेत. यापैकी अन्न ही अत्यंत निकडीची गरज. आर्थिक दृष्टया दिन दुबळ्या कुटुंबातील आबालवृद्ध संपुर्ण घटकांना दोन वेळेचे पोटभर भोजन मिळावे एवढीच गोरगरीबांची ही योजना येथे फोल ठरत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

जप्त केलीली रेती घरकुल धारकांना मोफत द्या : केशव तिराणिक
शासनाच्या धोरणात्मक कार्यक्रमानुसार घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना पाच ब्रास निःशुल्क रेती उपलब्ध करून मिळण्याचा अध्यादेश निघाला मात्र अधिकृत रेती घाटांचा व तारीख नसलेल्या परवाना पावत्या लाभार्थ्यांच्या माथी मारुन संबंधित यंत्रणेकडून हात झटकण्यात आले.अजूनही रेती अभावी अनेकांचे बांधकामं रखडलेली आहेत. मात्र मारेगाव तालुकांतर्गत ग्रामीण क्षेत्रात रेती तस्करीतून रेतीच्या साठेबाजीला उत आलेला आहे तेव्हा अवैध रेती साठेबाजांवर फौजदारी कारवाई करून जप्त केलेली रेती गरजु घरकुल लाभार्थ्यांच्या बांधकामास देण्यात यावी अशा आशयाच्या दोन महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा आदिवासी सेवक केशव तिराणिक यांनी मारेगाव तालुक्याचे तहसीलदार निलावाड यांना दिले.यावेळी विजय तोडकर,सूर्यवंशी,पीडित लाभार्थी हर्षल चांदेकर,दर्शना चांदेकर आदींची उपस्थिती होती.

ही योजना कार्यान्वित करण्यासाठी जिल्हास्तरावरून तांत्रिक अडचण आहे. प्रशासनाच्या सातत्य पूर्ण प्रयत्नात आयुष्यमान कार्ड योजनेचा तात्काळ अंमल होईल असा आशावाद टोलेबाजचा प्रतिनिधिंशी बोलतांना तहसीलदार उत्तम निलावाड यांनी व्यक्त केला.

पोलीस स्टेशनमध्ये दुर्गा उत्सव मंडळांच्या अध्यक्ष, सदस्य आणि नागरिकांची बैठक

वणी : आगामी सण-उत्सवांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून वणी पोलीस स्टेशनमध्ये आज (दिनांक २०/०९/२०२५) सकाळी ११:०० ते १२:३० या वेळेत दुर्गा उत्सव मंडळांचे अध्यक्ष, सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक श्री. गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.बैठकीमध्ये, दुर्गा विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्याबाबत आणि डी.जे. (DJ) चा वापर टाळून पारंपरिक वाद्यांचा उपयोग करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, खालील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले:• दुर्गा विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या जास्तीत जास्त स्वयंसेवकांनी सहभाग घ्यावा.• मिरवणुकीत कोणीही नशेत किंवा मद्यपान करून सहभागी होऊ नये.• दिलेल्या मार्गाचे (Route) आणि वेळेचे तंतोतंत पालन करावे.• विसर्जन घाटावर देवीचे विसर्जन करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी.• प्रत्येक दुर्गा मंडळाने नवरात्री उत्सवात मंडपात एक स्वयंसेवक पूर्णवेळ हजर ठेवावा.• नवरात्री उत्सवात कोणत्याही मंडळाने आक्षेपार्ह पोस्टर किंवा बॅनर लावू नये.या बैठकीत, गावातील कोणताही कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन मान्यवरांनी केले. तसेच, सर्व दुर्गा मंडळ अध्यक्ष आणि सदस्यांना डी.जे. मुक्त मिरवणुका काढण्याचे आणि विसर्जन शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले.या बैठकीला सुमारे १५० ते १७५ अध्यक्ष, सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.

आर्य वैश्य महिला आघाडी वणी तर्फे गरजूंना कपडे वाटप.

वणी :आज दि. २०/०९/२५ सकाळी ११ वाजता जत्रा मैदान येथे आठवडी दवाखाना घेतल्या जातो तिथे आर्य वैश्य महिला संघाने गोरगरीब व गरजू लोकांना कपडे वाटप व स्नेह भोजनाचा कार्यक्रमासह समाजातर्फे इतर सामाजिक उपक्रम जसे की वृक्षारोपण, कार्यशाळा आयोजन आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभाग यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जात असल्याचे दिसून येते.

आर्य वैश्य समाज मंडळे विविध सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असतात आणि कपडे वाटपासारखे उपक्रम त्यांच्या समाजसेवेचा भाग आहे. समाजातर्फे इतर सामाजिक उपक्रम जसे की वृक्षारोपण, कार्यशाळा आयोजन आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभाग यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जात असल्याचे दिसून येते.

आर्य वैश्य समाज मंडळे विविध सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असतात आणि महिला आघाडीचा सर्व सदस्य महिलांचा उपक्रमाने कपडे वाटपासारखे उपक्रम त्यांच्या समाजसेवेचा भाग असतो.

जय जय रामकृष्ण हरी,नगाजी महाराजांच्या जय घोषाने दुमदूमली मारेगाव नगरी


“जाता पंढरीसी सुख वाटे जीवा। आनंदे केशवा भेटताचि।।”

ही संत सेना महाराजांनी लिहिलेल्या अभंगातील ओळ.
या ओळींचा अर्थ आहे की पंढरपूरला जाताना जीवांना खूप आनंद होतो आणि विठ्ठल (केशव) यांना भेटल्याने त्यांना खूप सुख मिळते. पंढरपूरची महानता आणि तिथे मिळणारे सुख व्यक्त करतात.

हो! अगदी योग्यच लिहिलं महाराजांनी,
पण पंढरीचं सुख हे नगाजी महाराजांच्या चरणाशीच तर नाही ना ह्या ध्येय्याने झपाटलेला एक जगन्नाथ नगरी वेगाव येथे वास्तव्यास असलेला तरुण तेजस मांडवकर सलून व्यावसायिक गत दोन वर्षांपासून नगाजी महाराजांना शरण गेला आणि गत वर्षी पासून इंदिरा एकादशीला मारेगाव येथील नगाजी महाराज देवस्थान च्या नियोजित जागेवर श्रद्धापूर्वक तन मन धनाने कार्यक्रम घेतो आहे.
नाभिक बांधव एकत्र करून वैयक्तिक तो भजन पूजा आरती करून अन्नदान करतो. कार्यक्रमासाठी मोठया संखेने नाभिक समाजबांधव उपस्थित होते.
आणि हनुमान मंदिर येथे आरती करून दिंडीची सांगता करण्यात आली.

न भूतो अशा पारंपरिक वारकरी हरिपाठ दिंडीने वेधले शहर वाशियांचे लक्ष
पारंपरिक वारकरी संप्रदायाची दिंडी धोतर टोपी खांद्यावर शेला आणि टाळ सोबत मृदंगाचा कर्णमधुर नाद हे दिंडीचे वैशिट्य लक्षनीय होते. रस्त्यावरून ये -जा करणारे क्षणभर थबकुन आपसूकच स्वतःच्या भ्रमनध्ववनीत चित्रीकरण करतांना दिसत होते.
ना ध्वनी प्रदूषण ना वाहतुकीला खोळंबा असा अद्वितीय सोहळा संत नगाजी भक्तांनी आगळ्या वेगळ्या स्वरूपात संपन्न केला.

गहाळ झालेली मोबाईल पोलिसांना गवसले

वणी : पोलीस स्टेशन वणी येथे विविध तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईल विविध ठिकाणावरून गहाळ झाल्याबाबत सविस्तर तक्रार दिली होती.

त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन वणी येथील सायबर विभागामध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस अंमलदार छाया उंमरे यांनी CEIR पोर्टल वरून तांत्रिक दृष्टिकोनातून उत्कृष्ट तपास करून एकूण 13 मोबाईल शोधून काढले असून सदरचे हरवलेले मोबाईल हस्तगत करून आज दिनांक 18/09/2025 रोजी मोबाईल धारक मुळ मालकांना परत करण्यात आले आहेत.

सदरची कार्यवाही मा. ठाणेदार वणी यांचे मार्गदर्शनात LPC 493 छाया उंमरे यांनी केली आहे.