मारेगावात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

वाद सुरु असताना फिर्यादी सुनीलने तुम्ही महिलांसमोर वाद का घालत आहात असा प्रश्न उपस्थित केला असता तुषार ने त्याला थापडबुक्याने मारहाण केली तसेच अश्लील व जातिवाचक शिवीगाळ केली अशी तक्रार फिर्यादीने पोलीस स्टेशन मारेगावला दिली. या घटनेने सुनील व सुनीलच्या परिवारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

फिर्यादी सुनील गेडाम यांच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी आरोपी तुषार संजय पवार आणि संजय कन्हैया पवार यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) आणि भारतीय न्याय संहिता (बी एन एस)2023 चा कलम 115(2), 296 3(5), 351(2), 351(3) नुसार गुन्हा दाखल केला असून मारेगाव पोलीस पुढील तपास करत आहे.

युवा सेना जिल्हा सचिव पदी प्रतीक गौरकार यांची निवड

वणी : शिवसेना पक्षप्रमुख, व उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, तसेच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ जिल्हा युवा सचिव पदी प्रतीक गौरकार यांची निवड करण्यात आली.

प्रतीक गौरकार यांची युवा नेतृत्वावर चांगल्या प्रकारे पकड असून ते वरिष्ठांच्या विश्वासावर खरे उतरणार असे युवा पिढी मध्ये बोलल्या जात आहे. गौरकार यांची यवतमाळ जिल्ह्यामध्ये मजबूत पकड आहे. ते सनातन रक्ष दल मध्ये जिल्हा प्रभारी असून त्यांच्याशी कट्टर हिंदुत्ववादी युवा मुलांची टीम आहे. त्यांच्या पाठोपाठ शेकडो मुलांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याचे बोलले जात आहे.

यावेळी उपस्थित पराग पिंगळे विदर्भ समन्वयक, हरिहर भाऊ लिंगनवार शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख राजुदास भाऊ जाधव जिल्हाप्रमुख शिवसेना, विशाल गणात्रा युवा सेना संपर्कप्रमुख, आकाश राठोड जिल्हाप्रमुख सुधाकर गोरे यवतमाळ जिल्हा सह संपर्कप्रमुख विनोद मोहितकर तसेच किशोर नांदेकर यांच्या नेतृत्वात ही निवड करण्यात आली.

वणी नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमातींसाठी (एस.टी) राखीव अनेकांचा हिरमोड,

वणी: आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी वणी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून यंदा हे पद अनुसूचित जमाती (एस.टी.) महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे अनेक दिग्गज आणि अपेक्षित उमेदवारांचा हिरमोड झाला आहे, तर दुसरीकडे योग्य उमेदवारांच्या शोधाला आता वेग आला आहे.

नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबतची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच प्रसिद्ध केली. मागील कार्यकाळात हे पद सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी राखीव होते. यावेळी आरक्षण बदल झाल्याने राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत. स्थानिक पातळीवर सक्रिय असलेल्या अनेक नेत्यांना आता आपल्या उमेदवारीच्या शक्यता धूसर झाल्याचे जाणवू लागले आहे.

दरम्यान, विविध राजकीय पक्षांनी अनुसूचित जमाती प्रवर्गातील सक्षम, लोकप्रिय आणि कार्यकर्त्यांशी निगडित अशा उमेदवारांच्या शोधास सुरुवात केली आहे. पक्षांमध्ये यासाठी हालचाली सुरू असून, येत्या काही दिवसांत नावांची चर्चाही गती घेईल, अशी माहिती पक्षस्रोतांकडून मिळाली.

शहरातील मतदारसंघांमध्ये आरक्षणामुळे निर्माण झालेल्या नव्या राजकीय समीकरणांमुळे निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या अपेक्षा, स्थानिक प्रश्न आणि नव्या उमेदवारांची क्षमता यावरच यंदाच्या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.

बंजारा समाजाचा भव्य जनआक्रोश मोर्चा

यवतमाळ : यवतमाळ मध्ये दि. 6ओक्टोम्बर 2025ला बंजारा समाजाचा वतीने भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत असून बंजारा आयोजक समितीचा वतीने बंजारा बांधवाना मोर्चामध्ये मोठया संख्याने सहभागी होण्याचे आवाहन कारण्यात आले आहे.
बंजारा जमातीची अनुसूचित जातीत समावेश करावा तसेंच हैदराबाद गॅजेट, सीपी आणि बेरार गॅजेट अश्या प्रकारच्या मागणीसाठी उद्या यवतमाळ मधेभव्य बंजारा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत असून मोर्चाचे आयोजन आर्णी बायपास वनवासी मारोती पासून ते आर्णी रोड, पोस्टल ग्राउंड नंतर ज़िल्हाधिकारी कार्यालय येथे धडकणार आहे.

चंद्रपुर-आर्णी लोकसभा युवासेना जिल्हा समन्वयक पदी शुभम गोरे याची निवड

वणी : शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात चंद्रपुर- आर्णी लोकसभा क्षेत्राच्या जिल्हा समन्वयक पदी युवा नेतृत्व शुभम गोरे यांची निवड करण्यात आली.

वणी विधानसभा क्षेत्रात रस्त्याचा प्रश्न असो विद्यार्थांची समस्या तसेच रुग्णालयातील सामान्य जनतेच्या कुठल्याही अडचणी युवा नेते शुभम गोरे यांनी कुठलीही पर्वा न् करता पुर्ण करण्याकरिता भर दिला. याच कार्याची पावती समज़ुन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात युवासेना जिल्हा सचिव पदी प्रतीक गौरकर व युवासेना वणी विधानसभा सचिव पदी सुमित केशवाणी यांची निवड करण्यात आली.

या वेळी उपस्थित पराग पिंगळे पश्चिम विदर्भ समन्वयक , हरिहर भाऊ लिंगनवार शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख राजूदास भाऊ जाधव जिल्हाप्रमुख शिवसेना , विशाल गणत्रा युवासेना संपर्क प्रमुख , आकाश राठोड जिल्हा प्रमुख , सुधाकर गोरे ,विनोद मोहितकर ,किशोर नांदेकर यांच्या नेतृत्वात ही निवड करण्यात आली आहे

मारेगाव कोरंबी येथे मोबाईलवर स्टेटस च्या वादातून मारहाण

वणी : हद्दीतील मारेगाव कोरंबी येथे दि. 04ऑक्टोबर 25 च्या सकाळी अंदाजे 8.30वाजता मोबाईलवर स्टेटस ठेवण्याच्या वादावरून घटना घडली. तक्रारीवरून प्रकाश रमेश घोसले वय 27वर्ष रा. मारेगाव कोरंबी त्याच्या सोबत यातील आरोपीतांनी संगणमत करुन फिर्यादीसोबत मोबाईल वर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरुन वाद घालून शिवगाळ केली व जिवाने मारण्याची धमकी देवुन लाकडी दांडक्याने मारहाण केली व डाव्या डोळयाचे खाली मारहान करुन  गंभीर जखमी केले.

अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरुन आरोपी 1) गौरव महादेव मेश्रामवय 23 वर्ष 2) महादेव मेश्राम वय 55 वर्ष दोन्ही रा. मारेगाव कोरंबी यांच्यावर बीएनएस कलम 657/25 118 (1),125(a), 352,351(2)(3),3(5) कलम नुसार गुन्हा दाखल करून वणी पोलीस तपास करीत आहे.

मारेगाव कोरंबी परिसरात अवैद्य दारू व्यवसाय, दारू तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावलेली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चिरीमिरी धोरणामुळे अवैद्य धंदेवाले मुजोर झाले आहे अशा सततच्या भांडणामुळे महिला शाळकरी मुली व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अशाप्रकारे गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

वनोजा देवी येथे मजुरीच्या पैशाच्या वादातून मारहाण

वणी : मारेगाव हद्दीतील वनोजा देवी येथे 03ओक्टोम्बर 2025 च्या रात्री सुमारे 7 वा.   फिर्यादी अभिजीत दिनेश नगराळे वय 20 वर्ष रा.  पंचशील चौक वनोजा देवी हे अनिल झाडे यांचे पानठेल्यासमोर बसुन असताना यातील आरोपीतांनी संगणमत करुन जुन्या मजुरीच्या पैश्याच्या कारणावरुन वाद करुन हातातील कड्याने फिर्यादीचे डोक्यावर मारुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा भाऊ व वडील यांना थापडाबुक्क्याने मारहान करुन शीविगाळ केली व जिवाने मारण्याची धमकी दिली. अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरुन आरोपी1) साहिल सुखदेव काळे वय 21 वर्ष 2) राकेश सुखदेव काळे  वय 27 वर्ष दोन्ही रा. वनोजा देवी तालुका मारेगाव यांच्यावर भान्यास कलम 314/25 कलम 118(1), 352,351(2),351(3), सदरचा गुन्हा दाखलं करण्यात आला पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

मनसे गरबा महोत्सवा’त हर्षल इखारे ठरला दुचाकी गाडीचा मानकरी

वणी :महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वणी विधानसभा मतदारसंघ आयोजित ‘भव्य मनसे गरबा महोत्सवा’चा बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि थाटात पार पडला. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाची सांगता बक्षीस वितरणाने झाली. १२ ते ३० या वयोगटात हर्षल इखारे याने प्रथम क्रमांक पटकावत दुचाकी गाडीचे भव्य बक्षीस जिंकले.

◾अंतिम फेरीत स्पर्धकांची ‘काटे की टक्कर’
गरबा महोत्सवाच्या अंतिम राऊंडमध्ये खरंच ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळाली. शेवटचा दिवस असल्याने सर्व स्पर्धकांनी आपल्या सादरीकरणाची पातळी उंचावली होती. प्रत्येक सहभागीने अतिशय जोरदार सादरीकरण, पारंपरिक आणि आकर्षक वेशभूषा आणि अप्रतिम उत्साह दाखवत परीक्षकांना चकित केले. प्रत्येकजण विजेतेपदासाठी जीवाचे रान करत होता, ज्यामुळे सोहळ्याची रंगत अधिकच वाढली आणि अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत मैदानातील उत्कंठा शिगेला पोहोचली होती.
विविध वयोगटातील विजेत्यांचा गौरव
मनसे नेते राजू उंबरकर यांची कन्या मुक्ता उंबरकर हिच्यासह इतर मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व विजेत्यांना पारितोषिक देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी मनसेचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या गरबा महोत्सवात एकूण तीन वयोगटात बक्षीस वितरण करण्यात आले, ज्यात मौल्यवान बक्षिसांची खैरात करण्यात आली.

▪️ विजेते स्पर्धक
५ ते ११ वयोगट: प्रथम पारितोषिक (सायकल): समन्विता ठाकरे, द्वितीय क्रमांक: अमायरा पेटकर,तृतीय क्रमांक: अरशिद जयस्वाल
१२ ते ३० वयोगट (या गटात एकूण दहा बक्षिसे देण्यात आली): प्रथम क्रमांक (दुचाकी गाडी): हर्षल इखारे द्वितीय क्रमांक (लॅपटॉप): रिशिका चव्हाण, तृतीय क्रमांक (फ्रिज): प्राची डुकरे,चतुर्थ क्रमांक (वॉशिंग मशीन): प्रतिक्षा बेलेकर पाचवा क्रमांक (एल.सी.डी): माही ठाकूर इतर ५ मौल्यवान बक्षिसे
३० आणि त्यावरील वयोगट: प्रथम पारितोषिक (सोन्याची नथ): सोनिया भादेकर, द्वितीय क्रमांक (ओव्हन): अर्चना मंदावार, तृतीय क्रमांक (ज्यूसर): प्रिया आवारी, व्याक्युम क्लिनर: मित्तल खोब्रागडे, पैठणी साडी: रश्मी कोसे यासोबतच अनेक स्पर्धकांना प्रोत्साहन बक्षिसे म्हणूनही मौल्यवान वस्तू देण्यात आल्या.
या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद अविस्मरणीय होता. आयोजकांनी हा भव्य महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्व सहकारी, हितचिंतक आणि स्पर्धकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. प्रशिक्षक म्हणून जतिन राऊत, वैभव पुराणकर, जयशंकर खुराणा, राणी हांडे तर स्पर्धेचे परीक्षक म्हणून मनिषा बुरांडे व खुशबू वैरागडे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
बक्षीस वितरण सोहळ्याला मनसे महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्ष अलका टेकाम, मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, रुग्ण सेवा केंद्र अध्यक्ष अनिस सलाट, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना बोदाडकर, गरबा महोत्सव अध्यक्ष साहिल सलाट, शहराध्यक्ष अंकुश बोढे, राकेश वैद्य, गोविंदराव थेरे, विलन बोदाडकर, परशुराम खंडाळकर, लक्की सोमकुंवर, रोहन उंबरकर, मयुर गेडाम, मयुर घाटोळे, शंकर पिंपळकर, गौरव पुराणकर, संस्कार तेलतुंबडे, हिरा गोहोकार, योगेश तुराणकर, योगेश ताडम, तालिब खान, सचिन कुडमेथे, कृष्णा नीमसटकर, कृष्णा कुकडेजा, संदीप ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

अवैध दारूचा ‘विषारी’ विळखा..!

३० उमेदवारांच्या मुलाखती कोलामी बोलीभाषेत

दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोज मंगळवार ला बालविकास प्रकल्प कार्यालय मारेगाव येथे मारेगाव तालुका अंतर्गत येणाऱ्या मौजा पेंढरी, खंडणी (गावपोड), म्हैसदोडका गावपोड, हिवरी गावपोड येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त पदासाठी कोलामी बोलीभाषेत मुलाखती घेण्यात आल्या.

ज्या पोडात, वस्तीत, तांड्यात ५०% पेक्षा अधिक एकाच जमातीचे मुलं असतील , त्या पोडात, वस्तीत, किंवा तांड्यात जी भाषा बोलणारे मुलं अधिक असतील ती भाषा अवगत असणाऱ्या उमेदवाराला नियुक्ती देण्यासाठी शासनाने हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मुलांसोबत संवाद साधण्यासाठी उमेदवाराला त्यांची भाषा (बोली) अवगत असणे गरजेचे आहे. या नावीन्यपूर्ण निर्णयामुळे निश्चितच ग्रामीण भागातील (कोलाम पोडातील) मुले शिक्षणाच्या प्रवाहात येतील आणि त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

मुलाखती करिता कोलामी बोली तज्ञ म्हणून तालुक्यातील शिक्षक
पैकुजी आत्राम, वासुदेव टेकाम, सुरेश आत्राम यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुलाखती देण्याकरिता १५ अंगणवाडी सेविका आणि १५ मदतनीस सहभागी होत्या.